Mahabreaking

[breaking_news]

 Colleague Murders Laborer :कामात हलगर्जीपणावरून वाद, सहकाऱ्याने केली त्या मजुराची हत्या

Colleague Murders Laborer :परप्रांतीय मजुरांचा संशयास्पद मृतदेह पिंपळगाव उंडा परिसरात २९ एप्रिलच्या रात्री आढळला होता. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी तपास करीत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला. कामात हलगर्जीपणावरून झालेल्या वादातून सहकारी मजुरानेच लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी मजुरास अटक केली आहे.  करमजीत सिंग जनक सिंग (वय ५०, रा. साकीर कलान, पंजाब) असे मृतक मजुराचे नाव आहे तर सहकारी बबलीसिंग सुखदेवसिंग (रा. अकीलिया, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे.

 Colleague Murders Laborer

 पिंपळगाव उंडा परिसरात आढळला होता मृतदेह : साखरखेर्डा पोलिसांनी काही तासातच केला उगलडा

साखरखेर्डा : परप्रांतीय मजुरांचा संशयास्पद मृतदेह पिंपळगाव उंडा परिसरात २९ एप्रिलच्या रात्री आढळला होता. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी तपास करीत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला. कामात हलगर्जीपणावरून झालेल्या वादातून सहकारी मजुरानेच लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी मजुरास अटक केली आहे.  करमजीत सिंग जनक सिंग (वय ५०, रा. साकीर कलान, पंजाब) असे मृतक मजुराचे नाव आहे तर सहकारी बबलीसिंग सुखदेवसिंग (रा. अकीलिया, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 729 गावे टंचाईग्रस्त; 18 गावांना टँकर, 59 गावांत विहिरी अधिग्रहित

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव उंडा येथील वनिता किशोर काटकर यांच्या शेतासमोर असलेल्या टीनशेडमध्ये हार्वेस्टिंगचे काम करणारे परप्रांतीय मजूर वास्तव्यास होते. २९ एप्रिलच्या रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास करमजीत सिंग जनक सिंग   आणि त्याचा सहकारी बबलीसिंग सुखदेवसिंग  यांच्यात कामाच्या कारणावरून वाद झाला. गहू व मका काढणीदरम्यान कामात हलगर्जीपणा होत असल्याच्या कारणावरून झालेल्या या वादातून आरोपी बबलीसिंगने लोखंडी रॉडने करमजीत सिंग यांच्या डोक्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत मृतदेह खाटेवर ठेवलेला आढळल्याने नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण होत होता. मात्र, घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करत पोलिसांनी संशय घेतला व उपस्थित मजुरांची चौकशी सुरू केली. कसून चौकशीदरम्यान आरोपी बबलीसिंग सुखदेवसिंग याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार हार्वेस्टर मालक हरिंदर सिंग इंद्रजीत सिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून परप्रांतीय मजुरांमधील वादातून घडलेल्या या हत्याकांडाने शेतमजुरी क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top