Mahabreaking

[breaking_news]

Ram Auti Retires :चाळीस वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण; आदर्श शिक्षक राम औटी सेवानिवृत्त

Ram Auti Retires :ज्ञानदानाची अखंड साधना करत तब्बल ४० वर्षे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे चांडोळ येथील रहिवासी आदर्श शिक्षक राम औटी सर नुकतेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे परिसरातील शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ram Auti Retires

रुईखेड मायंबा परिसरात भावनिक निरोप, कार्याचा गौरव

बबन फेपाळे 

रुईखेड मायंबा : ज्ञानदानाची अखंड साधना करत तब्बल ४० वर्षे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे चांडोळ येथील रहिवासी आदर्श शिक्षक राम औटी सर नुकतेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे परिसरातील शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

औटी सरांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झाले. पहिली ते सातवी शिक्षण चांडोळ येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी डी.एड. चिखली, बी.एड. अमरावती आणि एम.एड. नाशिक येथे पूर्ण केले. त्यांच्या शिक्षक कारकिर्दीची सुरुवात एका कॉन्व्हेंट शाळेतून झाली. त्यानंतर डोणगाव, पळसखेड नागो (आश्रम शाळा), डावरगाव, ईरला, सावरगाव, वरना, डोंमरूळ, धामणगाव धाड आणि शेवटी रुईखेड मायंबा येथे त्यांनी सेवा बजावत विविध ठिकाणी आपला ठसा उमटवला.

प्रदीर्घ सेवाकाळात औटी सरांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते ज्ञान न देता त्यांच्यात संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्ये रुजवली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत त्यांनी अनेकांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि विविध क्षेत्रात प्रगतीसाठी प्रेरित केले. त्यामुळेच ते केवळ शिक्षक नव्हे, तर मार्गदर्शक ‘गुरुजी’ म्हणून ओळखले जातात.

सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभात सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी औटी सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शिस्तबद्ध, समर्पित आणि मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचा विशेष उल्लेख केला. “औटी सरांचे योगदान आमच्यासाठी कायम प्रेरणादायी आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

ज्ञान, संस्कार आणि अनुभवाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, सक्रिय आणि सर्जनशील वाटचालीच्या शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top