Local Monitoring Committee : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा अंतर्गत गठीत स्थानिक सनियंत्रण समितीमार्फत नोंदणी नूतनीकरण व लाभ वितरण कार्य पद्धतीबाबत आ. रणधीरभाऊ सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शासकीय कार्यालय येथे समितीचे सर्व सदस्य व संबंधित बांधकाम कामगार कल्याण विभागाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रथम बैठक पार पडली.

संजय तायडे
बोरगाव मंजू : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा अंतर्गत गठीत स्थानिक सनियंत्रण समितीमार्फत नोंदणी नूतनीकरण व लाभ वितरण कार्य पद्धतीबाबत आ. रणधीरभाऊ सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शासकीय कार्यालय येथे समितीचे सर्व सदस्य व संबंधित बांधकाम कामगार कल्याण विभागाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रथम बैठक पार पडली.
प्रसंगी कामगार बांधवांच्या असलेल्या समस्यांचे निवारण व्हावे आणि त्यांना वैयक्तिक लाभ,शिष्यवृत्ती व इतर सर्व मिळणाऱ्या उपयोगी योजनांबाबत माहिती दिली. तसेच समितीच्या प्रमुख उद्देश काय याचे महत्व सांगितले दरम्यान समितीचे उद्देश व कार्य प्रणालीचे वाचन करण्यात आले.समितीचे अध्यक्ष या नात्याने सर्व सदस्यांना कामगार बांधवांच्या करीता सेवाभावी कार्य करावे अशा सूचना दिल्या. बैठकीला विवेक भरणे,समितीचे सदस्य शाम राऊत, संतोष बाभुळकर,कल्याणी प्रवीण डिक्कर, सरला गोपाल फुंडकर, जयकृष्ण ठोकळ, वैभव माहोरे, पदाधिकारी संदीप गावंडे, प्रवीण डिक्कर, अनिल मुरूमकार, सलीम सय्यद आदी उपस्थित होते.

