Mahabreaking

[breaking_news]

Deulgaon Raja police :गोवंश तस्करीविरोधात देऊळगाव राजा पोलिसांचा धडक अॅक्शन प्लॅन; शेकडो वाहनांची तपासणी

Deulgaon Raja police : पश्चिम विदर्भातील प्रमुख पशुधन बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा येथील आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर गोवंश तस्करी रोखण्यासाठी देऊळगाव राजा पोलिसांनी शनिवारी विशेष नाकाबंदी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान शहराच्या चारही प्रमुख प्रवेशमार्गांवर तपासणी नाके उभारून शेकडो वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच बाजार समिती प्रशासन आणि पशुधन व्यापाऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.

Deulgaon Raja police

आठवडी बाजार पोलिसांच्या रडारवर; गोवंश वाहतुकीवर कडक नजर, बाजार समितीलाही सक्त सूचना

गजानन तिडके

देऊळगाव राजा : पश्चिम विदर्भातील प्रमुख पशुधन बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा येथील आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर गोवंश तस्करी रोखण्यासाठी देऊळगाव राजा पोलिसांनी शनिवारी विशेष नाकाबंदी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान शहराच्या चारही प्रमुख प्रवेशमार्गांवर तपासणी नाके उभारून शेकडो वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच बाजार समिती प्रशासन आणि पशुधन व्यापाऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.

देऊळगाव राजा शहरातील आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधनाची खरेदी-विक्री होत असते. या बाजाराचा गैरफायदा घेत काही तस्कर गोवंशाची अवैध वाहतूक करीत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर विशेष मोहीम राबविण्यात आली.

सिंदखेड राजा रोड, जालना रोड, जाफराबाद रोड आणि चिखली रोड या प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करून पोलिसांनी वाहने थांबवून तपासणी केली. पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, बाजार समितीच्या पावत्या तसेच वाहतुकीची वैधता तपासण्यात आली. संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

दरम्यान, पशुधन व्यापाऱ्यांना बाजार समितीची अधिकृत पावती नसताना कोणत्याही जनावरांची वाहतूक करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले. अनेकदा एका पावतीचा वापर करून अधिक पशुधनाची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने यापुढे प्रत्येक जनावराच्या खरेदी-विक्रीची स्वतंत्र नोंद आणि आवश्यक कागदपत्रे बाळगणे बंधनकारक राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी बाजार समितीच्या संबंधित कर्मचाऱ्यांनाही नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. पावत्या देताना पारदर्शकता राखावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आले.

या कडक तपासणी मोहिमेमुळे काही व्यापाऱ्यांनी बाजारातून माघार घेतल्याची चर्चा परिसरात होती. नाकाबंदी आणि तपासणीमुळे पशुधन बाजारातील व्यवहारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारादरम्यान अशी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत पोलिसांकडून तपासणी आणि गस्त सुरू राहणार आहे. त्यामुळे गोवंश तस्करी, अवैध वाहतूक आणि नियमबाह्य व्यवहारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top