Mahabreaking

[breaking_news]

Health Sanitary Inspector: १० वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी; हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्समुळे सरकारी नोकरीचे नवे दालन

Health Sanitary Inspector: आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणासोबत रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाच रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांपैकी हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (Health Sanitary Inspector – HSI/SI) हा एक महत्त्वाचा अभ्यासक्रम मानला जातो. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त हा अभ्यासक्रम सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण व्यवस्थापन क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवतो. बुलढाणा शहरातील स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले असून मोजक्याच जागा शिल्लक आहेत.

Health Sanitary Inspector

 आरोग्य क्षेत्रात करिअर घडवा; एक वर्षाच्या SI कोर्सला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद

बुलढाणा : आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणासोबत रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाच रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांपैकी हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (Health Sanitary Inspector – HSI/SI) हा एक महत्त्वाचा अभ्यासक्रम मानला जातो. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त हा अभ्यासक्रम सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण व्यवस्थापन क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवतो. बुलढाणा शहरातील स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले असून मोजक्याच जागा शिल्लक आहेत.

Health Sanitary Inspector

या अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण असून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त मानला जातो. कोर्सचा कालावधी एक वर्ष असून त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, संसर्गजन्य रोग प्रतिबंध, अन्न सुरक्षा, पर्यावरणीय स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि आरोग्य प्रशासन यासारख्या विषयांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते.

आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, रुग्णालये, औद्योगिक संस्था तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापनाला वाढते महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे प्रशिक्षित हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरची मागणीही वाढत आहे.

Health Sanitary Inspector

रोजगाराच्या संधी कोणत्या?

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना विविध सरकारी व निमसरकारी विभागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), सरकारी व खासगी रुग्णालये, औद्योगिक प्रकल्प, शैक्षणिक संस्था तसेच स्वच्छता आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांमध्ये रोजगार मिळू शकतो, असे स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलडाणाचे संस्थापक डॉ. सचिन सुपे यांनी सांगितले. तसेच आरोग्य सहाय्यक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी सुपरवायझर, पर्यावरण स्वच्छता कर्मचारी पर्यवेक्षक, सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ता अशा विविध पदांवर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेळोवेळी आरोग्य व स्वच्छता विभागातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. अशा भरती प्रक्रियेत हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो, असेही डॉ. सुपे यांनी सांगितले.

अभ्यासक्रमाचे महत्त्व

देशभरात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांना वाढते महत्त्व दिले जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढली आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नाही, तर समाजाच्या आरोग्यविषयक उन्नतीमध्ये योगदान देण्याची संधीही प्रदान करतो.

विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीत रोजगाराभिमुख कौशल्ये मिळविण्याचा हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा गांभीर्याने विचार करावा, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी येथे संपर्क करा

पत्ता :

स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा

वानखेडे ले-आऊट,

डॉ. मेहेत्रे हॉस्पिटल जवळ,

रेणुका टायपिंग समोर, बुलडाणा

 संपर्क : 9422945811

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top