Sudhakarrao Naik Junior College : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने आयोजित १९ वर्षाखालील मुलांची जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे पार पडली.या स्पर्धेत श्री. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान जुनिअर कॉलेज, शेकापूर फाटा (कार्ला) येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली.

पातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने आयोजित १९ वर्षाखालील मुलांची जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे पार पडली.या स्पर्धेत श्री. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान जुनिअर कॉलेज, शेकापूर फाटा (कार्ला) येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली.
महाविद्यालयाच्या अमर चव्हाण, स्वप्निल जाधव, आदित्य इंगळे,प्रज्वल इंगळे यांनी सुवर्णपदक तर सौरव सुलताने व हर्ष राठोड यांनी राैप्य पदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे कॉलेजचे नाव उज्ज्वल झाले असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था चे सचिव रामसिंग जाधव, प्राचार्य नारायण वायाळ, मुख्याध्यापक राठोड, मुख्याध्यापिका अनिता इंगळे तसेच बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल शेगोकार यांचे मार्गदर्शन लाभले.

