affected farmers : गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणारा पाऊस तसेच २६ व २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पातुर तालुक्यातील विशेषतः बाभुळगाव महसूल मंडळातील गावांमधील सोयाबीन, तूर व कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बाभुळगाव मंडळातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
पातुर : गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणारा पाऊस तसेच २६ व २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पातुर तालुक्यातील विशेषतः बाभुळगाव महसूल मंडळातील गावांमधील सोयाबीन, तूर व कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या नुकसानीची तातडीने दखल घेऊन पंचनामे करण्यात यावेत तसेच शेतकऱ्यांना त्वरित प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी बाभुळगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पातूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सततच्या पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाभुळगाव महसूल मंडळातील सततच्या पावसाने पिके जमीनदाेस्त झाली आहेत. साेंगणीसाठी आलेल्या साेयाबीनचे सततच्या पावसाने माेठे नुकसान झाले. नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये मदत देवून आधार द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे. निवेदन देताना राजेश गावंडे, शेख मुख्तार, सुरेश महानकार, राजू गवई, बब्बू भाई, शंकर बराटे, गणेश महल्ले, बंडू इंगळे, राजू उगले, विनोद कडाळे, गजानन भोपळे, शिवहरी तांबडे, गणेश काष्टे, गोपाल बदरखे, गोपाल अतकर, प्रदीप बर्डे, संदीप इंगळे, शिवचरण गोळे, संतोष वानखडे व जयराम लासुरकर यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

