Incomplete Pipeline : गावाच्या विकासासाठी आणि जलसमस्या सोडविण्यासाठी युवकांनी एकत्र येत श्रमदानातून अपूर्ण पाईपलाईनचे काम पूर्ण केले. डोणगाव लोणी गवळी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने ‘एक पाऊल समाजकार्याकडे’ या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गावाच्या जलसमस्येसाठी युवक सरसावले; फुले उत्सव समितीचा आगळावेगळा उपक्रम
डोणगाव : गावाच्या विकासासाठी आणि जलसमस्या सोडविण्यासाठी युवकांनी एकत्र येत श्रमदानातून अपूर्ण पाईपलाईनचे काम पूर्ण केले. डोणगाव लोणी गवळी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने ‘एक पाऊल समाजकार्याकडे’ या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील अपूर्ण राहिलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी समितीच्या युवकांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. यावेळी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यासोबतच गावातील विविध वॉर्डांमधील पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे गावातील संपूर्ण वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
या उपक्रमातून युवकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले. गावातील जलसमस्या दूर करण्यासाठी आणि विकासकामांना हातभार लावण्यासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले. या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
श्रमदान कार्यक्रमाला प्रा. विजय जागृत, कैलास जागृत, अभिजीत जागृत, नामदेव नटाळ, शुभम मगर, वैभव ढवळे, वैभव जागृत, उमेश भालेराव, सूरज मगर, हर्षल जागृत, ऋतिक खंडारे, महादेव ढवळे, दत्ताभाऊ अवचार, गणेश काळे, देवानंद जागृत, नयन जागृत, संदीप जागृत, पवन मानवतकर आणि महेश जागृत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गजानन जाधव, अंबादास जागृत आणि केशव चांगाडे यांनी श्रमदानात सहभागी होऊन मोलाचे योगदान दिले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

