Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Pandharkawada :पांढरकवडा येथे नकोशीला फेकले नालीत, दोन तासात गुन्हा उघड

Pandharkawada : शहरातील हनुमान वॉर्ड परिसरात नाल्याच्या काठावर नवजात मुलीला बेवारस अवस्थेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सकाळच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून एका युवकाने घटनास्थळी धाव घेतली. नवजात मुलगी आढळून येताच त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

Pandharkawada

माता पित्यावरुध्द गुन्हा; नागरिकांनी वाचवले नकोशीचे प्राण

पांढरकवडा : शहरातील हनुमान वॉर्ड परिसरात नाल्याच्या काठावर नवजात मुलीला बेवारस अवस्थेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सकाळच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून एका युवकाने घटनास्थळी धाव घेतली. नवजात मुलगी आढळून येताच त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तत्काळ बाळाला ग्रामीण रुग्णालयात हलवले. या प्रकरणी केतन गजानन कटकोजवार (रा. हनुमान वॉर्ड, पांढरकवडा) यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.न्या.सं. कलम ९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी गोपनीय बातमीदार, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला. सर्व बाजूंनी तपास करत असतानाच अवघ्या दोन तासांत पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला. त्यानुसार अर्चना सुनील शिवरकर (२८) व सुनील दिगांबर शिवरकर (३१), रा. नेहरू वॉर्ड, पांढरकवडा यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मुलगी झाली म्हणून तिला उघड्यावर फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जन्मदात्यांनीच बाळाला बेवारस सोडून पळ काढल्याने समाजातील स्त्रीद्वेषी मानसिकता आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक नितीन सुशीर, जमादार प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, दुधना मसराम, ज्योत्स्ना तलांडे, प्रफुल्ल पावसेकर यांनी केली. पुढील तपास सहायक निरीक्षक संदीप नरसाळे व शिपाई विशाल वाढई करीत आहेत.

दरम्यान, बालकल्याण समितीकडून बेवारस बाळांचे संगोपन केले जाते. नकोसे बाळ नाल्याच्या काठावर फेकण्याऐवजी समितीकडे सुपूर्द करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top