Mahabreaking

[breaking_news]

Datta Jayanti festival : धोत्रा नंदाई येथे शिव गोरक्ष धाम मंदिरात दत्तजयंती उत्सव साजरा

Datta Jayanti festival : स्थानिक शिव गोरक्ष धाम मंदिरात दत्तजयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री दत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण, ध्यान-संध्या, जप, हवन तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले.

Datta Jayanti

धोत्रा नंदाई  : स्थानिक शिव गोरक्ष धाम मंदिरात दत्तजयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री दत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण, ध्यान-संध्या, जप, हवन तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले.

यानंतर उत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या दत्त अभिषेक व पालखी मिरवणुकीने परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला. कार्यक्रमादरम्यान मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला.

या धार्मिक उत्सवात डॉक्टर पंढरी इंगळे (चिखली), सूर्यकर (संभाजीनगर), सरपंच विष्णू गीते, संदीप राऊत, विनोद मुंडे, मधुकर मुंडे, ज्ञानेश्वर मुंडे, गणेश गायकवाड, भीमराव मुंडे, सदानंद भालेकर, अनिल चेके यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top