Mahabreaking

[breaking_news]

municipal elections: नगरपालिकेसाठी उमेदवारांचा जोम वाढला; वाढीव मुदतीत प्रचाराला वेग

municipal elections: देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला काही तास शिल्लक असतानाच रविवारी सायंकाळी अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवडणूक पुढे ढकलल्याने उमेदवार व कार्यकर्ते आवाक झाले होते. आधीच तापलेल्या राजकीय वातावरणावर थंड पाण्याचा शिडकावा झाल्याचे चित्र होते. मात्र, आता वाढीव मुदत ही ‘संधी’ मानून उमेदवारांनी नव्या जोमाने प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे. नव्या कार्यक्रमाप्रमाणे २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

municipal elections

देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक : मतदान २० डिसेंबरला

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला काही तास शिल्लक असतानाच रविवारी सायंकाळी अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवडणूक पुढे ढकलल्याने उमेदवार व कार्यकर्ते आवाक झाले होते. आधीच तापलेल्या राजकीय वातावरणावर थंड पाण्याचा शिडकावा झाल्याचे चित्र होते. मात्र, आता वाढीव मुदत ही ‘संधी’ मानून उमेदवारांनी नव्या जोमाने प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे. नव्या कार्यक्रमाप्रमाणे २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

प्रचारात पुन्हा जोश; गल्लीबोळात गाठीभेटी सक्रिय

निवडणुकीची उमेदवारी, प्रचार जाहीर सभा आणि रॅलींनी शहरातील वातावरण तापलेले असताना निवडणूक स्थगित झाल्याने सर्व यंत्रणा काही तासांतच ठप्प झाली होती. नगराध्यक्षपदासाठीची तिरंगी लढत आणि प्रभागातील रंगतदार सामने यांमुळे राजकीय समीकरणे चांगलीच तापलेली होती.
मात्र, स्थगन उठल्यानंतर उमेदवारांनी पुन्हा मैदानात उतरून प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

 

निवडणूक का पुढे ढकलली?

पालिका निवडणुकीदरम्यान निर्मला खैरनार यांनी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्रुटींसह नाकारला होता. त्याविरोधात दाखल केलेले अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली होती. अर्जातील प्रमुख त्रुटी  कालबाह्य नोटीसद्वारे प्रमाणित प्रतिज्ञापत्र, शपथपत्रावर उमेदवारांच्या स्वाक्षरींचा अभाव,राष्ट्रीय पक्षांकडून दिलेल्या एबी फॉर्ममध्ये चुकीचे प्रभाग क्रमांक ही गंभीर चूक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. या त्रुटींमुळे अर्जदारांची वैधता आणि पारदर्शकता संशयास्पद ठरल्याने न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि परिणामी निवडणूक थोड्या दिवसांसाठी पुढे ढकलली गेली.

 

सुधारित निवडणूक कार्यक्रम

फक्त नगराध्यक्ष पदावरच स्थगिती लागू, प्रभागनिहाय उमेदवारी जैसे थे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : १० डिसेंबर, दुपारी ३.०० वाजेपर्यंत, चिन्ह वाटप : ११ डिसेंबरपर्यंत, प्रचाराचा अंतिम टप्पा : ११ ते १९ डिसेंबर, मतदान : २० डिसेंबर (सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३०), मतमोजणी व निकाल : २१ डिसेंबर, सकाळी १०.०० पासून

नगराध्यक्ष पदाच्या तिरंगी लढतीमुळे, तसेच प्रभागातील अटीतटीच्या मुकाबल्यामुळे देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक आता आणखी रंगतदार होणार हे निश्चित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top