Mahabreaking

[breaking_news]

  Operation Prahar: ऑपरेशन प्रहार  अंतर्गत धडक कारवाई; १५० किलो गोवंश मांसासह ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Operation Prahar: जिल्हा पोलिसांच्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत खदान पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत अवैधरित्या गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत १५० किलो संशयित गोवंश मांस, एक तीनचाकी ऑटो आणि एक मोपेड असा सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Operation Prahar

   अवैध गोवंश मांस वाहतुकीवर पोलिसांचा छापा; दोघे अटकेत, ऑटो व मोपेड जप्त

अकोला : जिल्हा पोलिसांच्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत खदान पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत अवैधरित्या गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत १५० किलो संशयित गोवंश मांस, एक तीनचाकी ऑटो आणि एक मोपेड असा सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ जुलै २०२६ रोजी खदान पोलीस ठाण्याचे पथक नियमित गस्तीदरम्यान कार्यरत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.

यावेळी शेख रेहान शेख रहेमान (वय २३, रा. कसबा पुरा, बार्शीटाकळी, जि. अकोला) आणि रशीद खान युसुफ खान (वय ३५, रा. इस्लाम चौक, हैदरपुरा, खदान, अकोला) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून १५० किलो संशयित गोवंश मांस, एमएच-३०-बीएन-२२८७ क्रमांकाची सुझुकी अॅक्सेस मोपेड तसेच एमएच-३०-बीसी-५६०४ क्रमांकाचा बजाज गोगो तीनचाकी ऑटो जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मांसाची तपासणी करून त्याबाबतचा पुढील कायदेशीर अहवाल प्राप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ निलेश खंडारे, पोहेका भूषण मोरे, पोहेका अभिमन्यू सदांशिव, पोलीस कॉन्स्टेबल वैभव कस्तुरे, शिवम दुबे आणि मंगेश खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top