Mahabreaking

[breaking_news]

  Counterfeit currency racket :अकोल्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; तिघांना अटक, ९७ हजारांच्या नकली नोटा जप्त

Counterfeit currency racket : स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत भारतीय चलनातील बनावट नोटांचे रॅकेट उध्वस्त केले आहे. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या एकूण १९४ बनावट नोटा, म्हणजेच ९७ हजार रुपयांच्या नकली चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील रॅकेटचे धागेदोरे बुलडाणा जिल्ह्यातील डोणगावपर्यंत पोहोचल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

  Counterfeit currency racket

   गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; डोणगावपर्यंत पोहोचले बनावट नोटांचे जाळे?

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत भारतीय चलनातील बनावट नोटांचे रॅकेट उध्वस्त केले आहे. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या एकूण १९४ बनावट नोटा, म्हणजेच ९७ हजार रुपयांच्या नकली चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील रॅकेटचे धागेदोरे बुलडाणा जिल्ह्यातील डोणगावपर्यंत पोहोचल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, अकोल्यातील गुडधी येथील चंदन भीमराव घांडोरे (वय ४३) हा भारतीय चलनातील बनावट नोटा खऱ्या नोटांप्रमाणे बाजारात चलनात आणण्यासाठी रेल्वे गेट, गुडधी परिसरातून घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुडधी येथील अलीयाबाद रोडवर सापळा रचला. कारवाईदरम्यान चंदन घांडोरे याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून ५०० रुपयांच्या २१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

चौकशीत या नोटा जहीरोद्दीन जबिरोद्दीन (रा. पठाणपुरा, मूर्तिजापूर) याच्याकडून घेतल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने मूर्तिजापूर येथे छापा टाकून जहीरोद्दीनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या आणखी १७३ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.

पुढील चौकशीत जहीरोद्दीनने या नोटा विठ्ठल संजय वारोकार (वय ३५, रा. गुडधी) याच्याकडून मिळाल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल वारोकार यालाही ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या बनावट नोटा बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील एका व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणातील तपासाचा विस्तार बुलडाणा जिल्ह्यापर्यंत झाला असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.

या तिघांविरुद्ध सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८० व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या बनावट चलनी नोटांच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top