Mahabreaking

[breaking_news]

Old Pension Scheme: जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी कटिबद्ध; शिक्षक आमदार विक्रम काळेंची ग्वाही

Old Pension Scheme: जु राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.

Old Pension Scheme

  शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी ५ सप्टेंबरला अकोल्यात ‘मूक मोर्चा’

बोरगाव मंजू : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.

nivedan

अकोला जिल्ह्यात पंचायत राज समितीच्या दौऱ्यादरम्यान शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आमदार विक्रम काळे यांची भेट घेऊन जुन्या पेन्शन योजनेबाबतच्या विविध समस्या व मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नावर शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार काळे यांनी दिले.

राज्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सुमारे २६ हजार मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही. इतर विभागांतील २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत असताना शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर मात्र अन्याय होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

विशेषतः २००५ पूर्वी नियुक्ती झाल्यानंतर संबंधित शाळांना कालांतराने १०० टक्के अनुदान प्राप्त झाल्याच्या कारणावरून काही शिक्षकांना जुनी पेन्शन योजना नाकारण्यात आली आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याची भूमिका शिक्षकांनी घेतली आहे.

या मागणीसाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी अकोला येथील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आमदार विक्रम काळे यांची भेट घेतली. जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शिष्टमंडळात अकोला जिल्हा शिक्षण संघर्ष संघटनेचे जिल्हा कार्यवाह संजय तायडे गुरुजी, प्रा. विठ्ठल पवार, प्रा. संजय म्हैसने, प्रा. दिलीप आप्तुरकर, मधुसूदन ढोरे, रमेश कांबळे, गोपाल मोरे, धर्मेंद्र श्रीवास्तव, द्वारकानाथ चिलवंते, शांताराम भाकरे आदी शिक्षक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top