Mahabreaking

[breaking_news]

Amol Gaikwad:‘सण-उत्सव साजरे करताना प्रशासनाला सहकार्य करा’; अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांचे आवाहन

Amol Gaikwad: सण-उत्सव साजरे करताना नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय हा महत्त्वाचा दुवा आहे, याची जाणीव ठेवून उत्सव साजरे करावेत. इतिहासात घडलेल्या अप्रिय घटना पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. आगामी गणेशोत्सव उत्साहात, मात्र शांततेत साजरा करावा. जाती-धर्माच्या भिंती बाजूला ठेवून एकमेकांच्या धर्माचा आदर करत सामाजिक सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले.

Amol Gaikwad

 कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवत गणेशोत्सव शांततेत साजरा करा; साखरखेर्ड्यात शांतता समितीची बैठक

साखरखेर्डा : सण-उत्सव साजरे करताना नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय हा महत्त्वाचा दुवा आहे, याची जाणीव ठेवून उत्सव साजरे करावेत. इतिहासात घडलेल्या अप्रिय घटना पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. आगामी गणेशोत्सव उत्साहात, मात्र शांततेत साजरा करावा. जाती-धर्माच्या भिंती बाजूला ठेवून एकमेकांच्या धर्माचा आदर करत सामाजिक सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले.

साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गणेशोत्सव व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोळा तसेच गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार युवराज रबडे, सरपंच अमित जाधव, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी रावसाहेब देशपांडे, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, माजी सरपंच सुनील जगताप, डी. एन. पांचाळ, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, मुख्याध्यापक गजानन कुले, माजी सैनिक अर्जुन गवई, अशोक इंगळे, माजी उपसरपंच सय्यद रफीक, सुरेश राजपूत, गोपाल राजपूत, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, युवा सेना तालुकाप्रमुख संदीप मगर, माजी उपसरपंच आयुब कुरेशी, अस्लम अंजुम, कय्यूम मेंबर, असलम शहा, गोपाल पाझडे, गोपाल शिराळे, गजानन इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कायदा हातात घेऊन चालणार नाही; प्रशासन व पोलिसांना सहकार्य करूनच उत्सव साजरे करावेत. ज्याप्रमाणे कावड यात्रा आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पडले, त्याचप्रमाणे आगामी सण-उत्सवही शांततेत व उत्साहात साजरे करावेत.

गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे, तसेच गुलाल खेळताना कोणालाही शारीरिक इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. उत्सवाच्या काळात नियमांचे पालन करून सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अशोक इंगळे, गजानन कुले, अस्लम अंजुम आणि रामदाससिंग राजपूत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक व संचालन ठाणेदार युवराज रबडे यांनी केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top