Mahabreaking

[breaking_news]

Cockroach Janata Party :कॉकरोच जनता पार्टीचे  जंतर-मंतरवर शक्तीप्रदर्शन ; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Cockroach Janata Party : नीट पेपर फुट प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालेल्या या पक्षाच्या समर्थकांनी नवी दिल्लीतील जंतरमंतर वर मोठी गर्दी करीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आंदोलन संपवत असतानाच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारला पाच दिवसांची मुदत दिली आहे. या पाच दिवसात राजीनामा न दिल्यास 13 जूनला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दीपके यांनी दिला आहे.

Cockroach Janata Party

केंद्र सरकारला पाच दिवसांची मुदत; राजीनामा न दिल्यास 13 जूनला पुन्हा जंतर मंतरवर आंदोलन करणार

नवी दिल्ली : नीट पेपर फुट प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालेल्या या पक्षाच्या समर्थकांनी नवी दिल्लीतील जंतरमंतर वर मोठी गर्दी करीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आंदोलन संपवत असतानाच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारला पाच दिवसांची मुदत दिली आहे. या पाच दिवसात राजीनामा न दिल्यास 13 जूनला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दीपके यांनी दिला आहे.

यापूर्वी शनिवारी सकाळी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत पोहोचताच त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही सहभाग घेतला.

आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके म्हणाले, “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी आई आणि बहिण मला परत येऊ नकोस, तुला अटक केली जाईल अशी भीती व्यक्त करत होत्या. माझ्या घरी परतण्याबाबत त्यांना चिंता वाटत होती. ही केवळ माझ्या आईची भीती नाही, तर देशातील प्रत्येक त्या कुटुंबाची भीती आहे ज्यांचा मुलगा किंवा तरुण सरकारविरोधात आवाज उठवतो.”

ते पुढे म्हणाले, “सरकारच्या भीतीच्या राजकारणाखाली आपण किती दिवस जगणार? आता आम्ही या भीतीला घाबरणार नाही.” यावेळी त्यांनी “तुमच्या राजकारणाला घाबरणार नाही”, “धर्माच्या नावावरील राजकारण बंद करा”, तसेच “हिंदू-मुस्लिम राजकारण बंद करा” अशा घोषणाही दिल्या.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यापासूनच अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती दिली.

दरम्यान, शिवसेना नेत्या व माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सीजेपीला आंदोलनाची परवानगी दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले की, “कदाचित प्रथमच दिल्ली पोलिसांनी योग्य निर्णय घेत सीजेपीला आंदोलनाची परवानगी दिली आहे.”

सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये देशातील प्रश्नपत्रिका फुटी, भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि विविध घोटाळ्यांचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली.

भूषण यांनी म्हटले की, “देश सध्या अनेक गंभीर आव्हानांना सामोरा जात आहे. अशा परिस्थितीत कॉकरोच जनता पार्टीचा उदय हा नैसर्गिक परिणाम आहे. या जनरेशन-झेड आंदोलनाला सुज्ञ पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.”

सीजेपीचे आंदोलन संपले असले तरी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पक्ष ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच येत्या पाच दिवसात प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा 13 जूनला आंदोलन करण्यात येणार असल्याचे सीजेपीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top