Mahabreaking

[breaking_news]

Vaibhav Suryavanshi :१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री; सूर्याचे कर्णधारपद गेले, श्रेयस अय्यरकडे नेतृत्व

Vaibhav Suryavanshi :भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचत वैभव सूर्यवंशी याची भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे. अवघ्या १५ वर्षे ७१ दिवस वय असलेल्या वैभवची जून-जुलै महिन्यात होणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी तसेच सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी (एशियन गेम्स) भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Vaibhav Suryavanshi

आशियाई क्रीडा स्पर्धा व इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यासाठी टी-20 संघाची घोषणा ; तिलक वर्मा उपकर्णधार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचत वैभव सूर्यवंशी याची भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे. अवघ्या १५ वर्षे ७१ दिवस वय असलेल्या वैभवची जून-जुलै महिन्यात होणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी तसेच सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी (एशियन गेम्स) भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.भारतीय संघाला विश्वचषक जिंकुन देणारा कर्णधार सुर्यकुमार यादव याचे कर्णधारपद आणि संघातील स्थानही गेले आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे.

वैभव सूर्यवंशी हा भारतीय संघासाठी निवडला गेलेला आतापर्यंतचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी महिला आणि पुरुष क्रिकेट मिळून सर्वात कमी वयात भारतीय संघात निवड होण्याचा विक्रम शेफाली वर्माच्या नावावर होता. शेफालीची निवड १५ वर्षे २२० दिवसांच्या वयात झाली होती. पुरुष क्रिकेटमध्ये हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. त्यांची भारतीय संघात निवड १६ वर्षे १९४ दिवसांच्या वयात झाली होती.

विशेष म्हणजे, वैभवला इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यात किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत एक जरी सामना खेळण्याची संधी मिळाली, तर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरेल. सध्या हा विक्रम शेफाली वर्मा आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे.

दरम्यान, भारतीय टी-20 संघाच्या नेतृत्वाची धुरा श्रेयस अय्यर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तिलक वर्मा यांची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

 

आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि प्रिन्स यादव.

 

आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top