Mahabreaking

[breaking_news]

 birth anniversary of Lord Rama :नामस्मरण, कीर्तन आणि दिंड्यांचा जयघोष; श्रीरामजन्मोत्सवाचा आध्यात्मिक सोहळा

birth anniversary of Lord Rama :श्री गजानन महाराज मंदिर, लक्ष्मी नगर; श्री संत गजानन महाराज संस्थान, रेणुका नगर; तसेच श्रीराम मित्र मंडळ, बोरगाव मंजू यांच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सव धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक धार्मिक विधींनुसार संपन्न झाला.

birth anniversary of Lord Rama

‘जय श्रीराम’च्या गजरात भक्तीची पर्वणी; हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्सवाचा मंगल समारोप

संजय तायडे 

बोरगाव मंजू : श्री गजानन महाराज मंदिर, लक्ष्मी नगर; श्री संत गजानन महाराज संस्थान, रेणुका नगर; तसेच श्रीराम मित्र मंडळ, बोरगाव मंजू यांच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सव धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक धार्मिक विधींनुसार संपन्न झाला.

शहरातील मुख्य मार्गावरून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. ग्रामस्थांनी उत्सवात मोठ्या श्रद्धेने सहभागी होत पूजा-अर्चा केली. संत गजानन महाराज मंदिर, लक्ष्मी नगर; संत गजानन महाराज संस्थान, रेणुका नगर; तसेच श्रीराम मित्र मंडळ सार्वजनिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

birth anniversary of Lord Rama

मिरवणुकीदरम्यान संत गजानन महाराजांची मूर्ती तसेच भव्य रथावर प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या प्रतिमा विराजमान करण्यात आल्या होत्या. चिमुकल्यांनी राम, लक्ष्मण, सीता देवी, हनुमान तसेच वानरसेनेचे हुबेहूब रूप धारण करून नगर प्रदक्षिणेत विशेष आकर्षण निर्माण केले. तसेच घोडेस्वारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारला होता.

दरम्यान, गाथा आणि पालखीच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध भागांतून सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावरून नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला.

birth anniversary of Lord Rama

सकाळी ठिकठिकाणी महादेव-पार्वती विवाह सोहळा पार पडला, ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली. तसेच संत गजानन महाराज मंदिर, रेणुका नगर येथे श्री अध्यात्म रामायण स्वाहाकाराची चैत्र शुद्ध नवमीला विधिवत पूर्णाहुती करण्यात आली.

दुपारी “जय श्रीराम”च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि मंगल वाद्यांच्या सुरावटीत प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भजनी दिंड्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. टाळ, वीणा, मृदंग यांच्या साथीने संत वाङ्मय—ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

बोरगाव मंजूसह पंचक्रोशीतील ग्रामीण भागातही हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भक्ती, सेवा आणि समर्पण यांचा संगम असलेला हा श्रीरामनवमी उत्सव भाविकांच्या मनात आध्यात्मिक ऊर्जा जागवणारा ठरला. “श्रींच्या कृपेने भाविकांची सेवा घडली,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुर्तिजापूर पोलिस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे, ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र धुळे, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांच्यासह बोरगाव मंजू व मुर्तिजापूर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top