Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

NAFED :कासारखेड येथे नाफेड खरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

NAFED :शहरातील कासारखेड येथे धनश्री अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी सहकारी संस्था यांच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या नाफेड खरेदी केंद्राचे बुधवारी (दि. २५ मार्च २०२६) उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना हरभरा व तूर पिकांची शासकीय खरेदी जवळच्या ठिकाणीच करता येणार असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NAFED

हरभरा-तूर खरेदी आता जवळच; नव्या केंद्रामुळे वाहतूक खर्चात बचत

जाकीर अहमद

 बाळापूर : शहरातील कासारखेड येथे धनश्री अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी सहकारी संस्था यांच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या नाफेड खरेदी केंद्राचे बुधवारी (दि. २५ मार्च २०२६) उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना हरभरा व तूर पिकांची शासकीय खरेदी जवळच्या ठिकाणीच करता येणार असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोहम्मद जमीर होते, तर उद्घाटन नगर उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आजी-माजी नगरसेवकांसह परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या शेतकरी म्हणून शैलेंद्र धनोकार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला दत्ता धनोकार, पिंटू ठाकूर, प्रितेश गुजराथी, मो. अक्रम, नफीस रंगारी, प्रशांत गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अजय चिंचोलकर यांनी सांगितले की, हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३० मार्च २०२६ आहे. त्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून शासनाच्या नाफेड खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नवीन खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे कासारखेड व आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांना आपले पीक विक्रीसाठी दूरवर जावे लागणार नसून, जवळच्या केंद्राचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top