Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Jai Shri Ram :‘जय श्रीराम’च्या जयघोषात नगरी दुमदुमली; सर्व समाजाचा उत्स्फूर्त सहभाग!

Jai Shri Ram :साखरखेर्डा येथे श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील श्रीराम मंदिरात सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. श्रीराम चरित्र वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर त्यानंतर पुष्पवृष्टी करीत श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.

Jai Shri Ram

ढोल-ताशांच्या निनादात श्रीरामाची मिरवणूक; फुगडी, पुष्पवृष्टीने रंगला उत्सव!

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथे श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील श्रीराम मंदिरात सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. श्रीराम चरित्र वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर त्यानंतर पुष्पवृष्टी करीत श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.

गावातील माळीपेठ येथील श्रीराम मंदिर, श्री प्रल्हाद महाराज मंदिर तसेच रोकडोबा हनुमान मंदिरातही श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक मंदिर परिसरात ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.

दुपारी तीन वाजता साखरखेर्डा नगरीतून सजविलेल्या रथातून भगवान श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक निघाली. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी श्रीरामाचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ केला.

श्रीराम मंदिर ते श्री प्रल्हाद महाराज संस्थानपर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मिरवणूक येताच रामभाऊ जाधव, संग्रामसिंह राजपूत, दाऊद कुरेशी, रामदाससिंग राजपूत, सैय्यद रफीक, इब्राहिम शहा, युनूस नाईकवाडी, असलम अंजूम यांच्यासह अनेकांनी पुष्पवृष्टी करून श्रीरामाचे स्वागत केले.

यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, महेंद्र पाटील, चंद्रशेखर शुक्ल, भाग्यश्री खेडेकर, श्रीनिवास खेडेकर, योगेश जाधव, दिलीप बेंडमाळी, संतोष मंडळकर, व्ही. के. जगताप यांसह अनेक मान्यवरांनी दर्शन घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

महिलांची मोठी उपस्थिती ही या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरली. महिलांनी पारंपरिक फुगडी खेळत उत्सवात रंगत आणली. संपूर्ण गावात आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीचे आयोजन सिताराम काळे, रावसाहेब देशपांडे, देवेंद्र देशपांडे, गोपाल शिराळे, मंगलसिंग राजपूत, गोपाल पाझडे, संतोष जैस्वाल, मयूर जैस्वाल यांच्यासह उत्सव समितीच्या सदस्यांनी केले.कार्यक्रमादरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून शांतता व सुव्यवस्था कायम राखली. माळीपेठ परिसरात दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेतला. एकूणच, साखरखेर्ड्यातील श्रीराम नवमी उत्सव भक्ती, एकात्मता आणि उत्साहाचा सुंदर संगम ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top