Mahabreaking

[breaking_news]

Sadanand Kharode: निर्भीड पत्रकारितेचा गौरव; सदानंद खारोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Sadanand Kharode: पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार सदानंद खारोडे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची भूमिका आणि निर्भीड पत्रकारितेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

Sadanand Kharode

  सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकाराचा सन्मान; खरेदी विक्री संघाकडूनही सन्मान

तेल्हारा : पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार सदानंद खारोडे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची भूमिका आणि निर्भीड पत्रकारितेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी ‘सकाळ’ वृत्तसेवेचे योगेश फरफट, आकोटचे मुकुंद कोरडे, शंतनू राऊत, श्रीकांत राऊत आणि संजय खांडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल गावंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गजानन नारे, प्रा. सुभाष गादिया, विठ्ठल महल्ले, अनिल माहोरे, सुधाकर खुमकर, प्रमोद मुरुमकार यांच्यासह जिल्ह्यातील संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सदानंद खारोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडत लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

तेल्हारा येथून प्रशांत विखे, रामाभाऊ फाटकर, धर्मेश चौधरी, निलेश जवकार, अनिल अवताडे, आनंद बोदळे, विलास वानखडे यांच्यासह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित पत्रकार व मान्यवरांनी सदानंद खारोडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील पत्रकारिता वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

sadanand

तेल्हारा खरेदी-विक्री संघाकडूनही सन्मान

तेल्हारा खरेदी-विक्री संघाच्या वतीने ‘सकाळ’चे तालुका प्रतिनिधी सदानंद खारोडे यांचा सामाजिक आणि शेतीविषयक प्रश्नांवर सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संघाचे उपाध्यक्ष बडुंभाऊ कोरडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी माजी शिक्षण सभापती पुंडलिक अरबट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संदीप खारोडे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ ढोले, शिवहरी काळे तेल्हारकर, अनंत अहेरकर, व्यवस्थापक विलास वानखडे, पवन खारोडे, काकड आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top