Mahabreaking

[breaking_news]

Cattle-Theft Gang :राजेगाव शिवारात गुरे चोरणारी टोळी सक्रीय; म्हशीसह जनावरे लंपास

Cattle-Theft Gang :साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील राजेगाव येथील एका शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाळीव प्राण्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे १ लाख ४३ हजार रुपयांचे जनावरे लंपास करण्यात आले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Cattle-Theft Gang

१ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान ; साखरखेर्डा परिसरात भीतीचे वातावरण

 साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील राजेगाव येथील एका शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाळीव प्राण्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे १ लाख ४३ हजार रुपयांचे जनावरे लंपास करण्यात आले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुर्जन–सुलतानपूर मार्गावरील राजेगाव येथे अरविंद मधूकर तांगडे यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात दोन म्हशी, एक वासरू, एक शेळी व दोन पिल्ले बांधलेली होती.

२२ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप व कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन म्हशी, एक वासरू, एक शेळी आणि दोन पिल्ले वाहनाद्वारे चोरून नेल्याचे समोर आले आहे. चोरीस गेलेल्या या जनावरांची एकूण किंमत सुमारे १ लाख ४३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी अरविंद तांगडे यांनी २३ मार्च रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रामदास वैराळ करीत आहेत.दरम्यान, शेतमालासोबतच आता पाळीव जनावरांवरही चोरट्यांचा डोळा असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top