Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

NCP :देऊळगाव राजात राष्ट्रवादीची संघटनात्मक हालचाल; ज्ञानेश्वर टेकाळे तालुका कार्याध्यक्ष

NCP :देऊळगाव राजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत ज्ञानेश्वर टेकाळे यांची तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे तालुक्यातील पक्षाची राजकीय हालचाल अधिक गतिमान होण्याची चिन्हे दिसत आहेत.

NCP

राष्ट्रवादीत नवे बळ; टेकाळे यांच्या नियुक्तीने तालुक्यात संघटन मजबूत करण्यावर भर

 गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत ज्ञानेश्वर टेकाळे यांची तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे तालुक्यातील पक्षाची राजकीय हालचाल अधिक गतिमान होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या सूचनेनुसार व पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नियुक्तीपत्रात टेकाळे यांना पक्षाची विचारधारा व धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या नियुक्तीप्रसंगी तालुका अध्यक्ष सदाशिव मुंढे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अजगर शाह, सतीश झिने, सचिन मुंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, ज्ञानेश्वर टेकाळे यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top