Mahabreaking

[breaking_news]

District Bank election :जिल्हा बँक निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १४ वर्षांनंतर सहकारात सत्तेचा महासंग्राम

District Bank election : जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग अखेर फुंकले गेले आहे. तब्बल १४ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नव्याने कलाटणी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकेकाळी आर्थिक अडचणी, वाढलेले अनुत्पादक कर्ज आणि प्रशासकीय राजवटीमुळे चर्चेत असलेली बँक आता सुमारे २३.५५ कोटी रुपयांच्या नफ्यासह नव्या उभारीत आली आहे. त्यामुळेच बँकेच्या सत्तेवर पुन्हा एकदा राजकीय दिग्गजांच्या नजरा खिळल्या आहेत.

District Bank election
३ जुलैला अंतिम मतदार यादी; जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग

बुलढाणा : जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग अखेर फुंकले गेले आहे. तब्बल १४ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नव्याने कलाटणी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकेकाळी आर्थिक अडचणी, वाढलेले अनुत्पादक कर्ज आणि प्रशासकीय राजवटीमुळे चर्चेत असलेली बँक आता सुमारे २३.५५ कोटी रुपयांच्या नफ्यासह नव्या उभारीत आली आहे. त्यामुळेच बँकेच्या सत्तेवर पुन्हा एकदा राजकीय दिग्गजांच्या नजरा खिळल्या आहेत.

add
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून हरकती दाखल करण्याची मुदत संपली आहे. प्राप्त हरकतींवर २९ जून रोजी निर्णय होणार असून ३ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
सन २०१० नंतर जिल्हा बँकेची निवडणूक झालेली नाही. या कालावधीत बँकेने आर्थिक पुनरुज्जीवनाचा मोठा प्रवास केला. नाबार्ड, रिझर्व्ह बँक आणि शासनाच्या निकषांनुसार आर्थिक शिस्त वाढविण्यात आली. त्रिसदस्यीय समिती आणि त्यानंतर प्राधिकृत समितीच्या नियंत्रणाखाली बँकेचा कारभार सुरू राहिला. आता पुन्हा लोकशाही पद्धतीने संचालक मंडळ निवडले जाणार असल्याने सहकारातील सत्तासमीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत २१ संचालकांची निवड होणार असून त्यांच्याच मतांतून अध्यक्षपदाचा चेहरा निश्चित होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ बँकेपुरती मर्यादित न राहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते, गट-तट आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांची नजर या निवडणुकीवर लागून आहे.

 

‘राजकीय वैर, सहकारात मैत्री’ पुन्हा दिसणार?
जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा इतिहास पाहता अनेकदा राजकीय पक्षांचे कट्टर विरोधक सहकाराच्या राजकारणात एकाच पॅनेलमध्ये दिसून आले आहेत. त्यामुळे यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार की पुन्हा सर्वपक्षीय सहमतीचा प्रयोग पाहायला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्याचबरोबर नव्या नेतृत्वालाही यंदा संधी मिळण्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे.
३ जुलैनंतर सुरू होणारी मोर्चेबांधणी आणि राजकीय जुळवाजुळवच जिल्ह्यातील पुढील सहकार व राजकारणाची दिशा ठरवणार असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top