Mahabreaking

[breaking_news]

Caste validity issue :जात वैधतेवरून बाळापूरच्या राजकारणात खळबळ; नगरसेविकेविरोधात पडताळणी समितीकडे तक्रार

Caste validity issue : नगर परिषद प्रभाग क्रमांक 4अ मधील नगरसेविका रफत जबीन सय्यद अहमद अली यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेत अकोला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने बाळापूरच्या स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. निवडणुकीतील प्रतिस्पर्धी गटाकडून ही तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

Caste validity issue

निवडणुकीतील लढत आता समितीच्या दालनात; प्रभाग 4अ मधील राजकीय संघर्षाला नवे वळण

बाळापूर : नगर परिषद प्रभाग क्रमांक 4अ मधील नगरसेविका रफत जबीन सय्यद अहमद अली यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेत अकोला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने बाळापूरच्या स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. निवडणुकीतील प्रतिस्पर्धी गटाकडून ही तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

add

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रतिस्पर्धी यांचा मुलगा इरशाद अहमद शेख हारून यांनी 18 जून 2026 रोजी अकोला येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला. समितीच्या नोंदीनुसार हा विषय “जात प्रमाणपत्र अपील” म्हणून दाखल करण्यात आला असून नगरसेविकांच्या जात वैधता प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रियेची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या तक्रारीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तक्रारदारांनी निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे नगरसेविकांच्या समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत जात वैधता प्रमाणपत्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच प्राप्त झाल्याचा दावा केला आहे. तसेच हा वाद आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात आल्याचेही समर्थकांचे म्हणणे आहे.

add

स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते, नगर परिषद निवडणुकीनंतरही काही प्रभागांमध्ये राजकीय संघर्ष संपलेला नसून विविध मुद्द्यांच्या माध्यमातून विरोधी गट एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रभाग क्रमांक 4अ मधील हे प्रकरण त्याचाच भाग मानले जात आहे.

सध्या हे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर विचाराधीन राहण्याची शक्यता असून समितीकडून कागदपत्रांची छाननी, दोन्ही बाजूंची सुनावणी आणि कायदेशीर तपासणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे या विषयावर कोणताही निष्कर्ष काढणे अद्याप घाईचे ठरणार आहे.

मात्र या घडामोडींमुळे माळीपुरा, चांवलपुरा आणि आझमपुरा (कसारखेडा) परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चौकशीतून कोणती तथ्ये समोर येतात आणि समितीचा अंतिम निर्णय काय होतो, यावर स्थानिक राजकीय समीकरणांची पुढील दिशा अवलंबून राहणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top