Mahabreaking

[breaking_news]

Bribe of ₹60,000 Demanded for Beer Shop :बिअर शॉपीच्या नाहरकतसाठी मागितली ६० हजार रुपयांची लाच;ग्रामपंचायतचे सचिव ,लिपिक गजाआड

Bribe of ₹60,000 Demanded for Beer Shop : वैभव बार अँड बिअर शॉप’या नावाने व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्रासाठी एक लाख रुपयांची मागणी करून ६० हजार रुपयांची लाच घेतांना वाडेगाव ग्रामपंचायत सचिव आणि लिपिकास अकोला एसीबीच्या पथकाने सोमवार, दि. २५ मे रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास रंगेहाथ अटक केली.

Bribe

 अकोला एसीबीची वाडेगावात धडक कारवाई ; एक लाख रुपयांची केली होती मागणी

राहुल सोनोने  

 वाडेगाव : वैभव बार अँड बिअर शॉप’या नावाने व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्रासाठी एक लाख रुपयांची मागणी करून ६० हजार रुपयांची लाच घेतांना वाडेगाव ग्रामपंचायत सचिव आणि लिपिकास अकोला एसीबीच्या पथकाने सोमवार, दि. २५ मे रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास रंगेहाथ अटक केली.  या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  योगेश तोताराम कापकर, पद-ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) व  सुभाष रामकृष्ण सरप ,लिपीक, ग्रामपंचायत वाडेगांव अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या लहान भावास ग्रामपंचायत वाडेगाव हद्दीत ‘वैभव बार अँड बिअर शॉप’ या नावाने व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. यासंदर्भात तक्रारदाराने ग्रामसेवक योगेश कापकर यांची भेट घेतली असता, प्रमाणपत्र देण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

मात्र, मागितलेली लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने दि. ८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर दि. १३ मे रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी योगेश कापकर यांनी तक्रारदाराच्या भावाच्या नावाने वाडेगाव येथे नवीन वाइन बार सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात ६० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

यानंतर दि. १६ मे रोजी ग्रामपंचायत वाडेगाव येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान ग्रामसेवक योगेश कापकर यांनी मागितलेली लाच रक्कम लिपिक सुभाष सरप यांच्याकडे देण्यास सांगितल्याचा आरोप आहे. दि. २५ मे रोजी पुन्हा सापळा रचून कारवाई करण्यात आली. यामध्ये तक्रारदाराकडून स्वीकारलेली ६० हजार रुपयांची लाच रक्कम लिपिक सुभाष सरप यांच्याकडे देण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. पंचासमक्ष सुभाष सरप यांच्याकडून ६० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर व पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top