Mahabreaking

[breaking_news]

Police Raid :वाकोडी शिवारात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलिसांची धाड ; तिघांवर गुन्हा दाखल

Police Raid : मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाकोडी शिवारात स्वत:च्या घरात कुंटनखाना चालवणाऱ्या दाम्पत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत दोन महिलांची सुटका केली.  या प्रकरणात दोन पुरुष व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police Raid

दोन महिलांची सुटका; राहत्या घरातच सुरू होता कुंटनखाना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

गजानन तिडके

बुलढाणा : मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाकोडी शिवारात स्वत:च्या घरात कुंटनखाना चालवणाऱ्या दाम्पत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत दोन महिलांची सुटका केली.  या प्रकरणात दोन पुरुष व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई   पोलीस अधीक्षक निलेश तांबे,   अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,   अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व   उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार दिनांक २५ मे रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राम वाकोडी शिवारातील महावीर नगर परिसरातील एका घरामध्ये महिलांना आणून अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. घटनास्थळी एक ग्राहक व दोन महिला आढळून आल्याने संबंधितांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (पिटा) अंतर्गत कलम ३, ४, ५ व ७ अन्वये कारवाई करण्यात आली. या प्रकरणात संतोष हरिभाऊ वाघ, पांडुरंग तांदूळकर व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २,५०० रुपयांची रोख रक्कम, तीन भ्रमणध्वनी व इतर साहित्य असा एकूण ३३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत पोलीस उपअधीक्षक सागर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, मुख्य पोलीस शिपाई राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, सतीश हाताळकर, विजय वारुळे, पोलीस कर्मचारी अमोल वनारे, मंगेश सनगाळे, महिला पोलीस कर्मचारी कोमल इंगळे, दिपाली चव्हाण, समाधान टेकाळे, वैभव निंबाळकर तसेच सहाय्यक उपनिरीक्षक कोसे यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top