Mahabreaking

[breaking_news]

Brawl over Corn Cobs :मक्याच्या कणसावरून हाणामारी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, गोसिंग शिवारातील घटना 

Brawl over Corn Cobs :किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट हिंसाचारात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना गोसींग शिवारात घडली. मक्याचे कणीस तोडल्याच्या कारणावरून तिघांनी एकाच कुटुंबासह नातेवाईकांवर काठी-दगडांनी हल्ला चढवत बेदम मारहाण केली. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून, बोराखेडी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Brawl over Corn Cobs
मोताळा : किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट हिंसाचारात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना गोसींग शिवारात घडली. मक्याचे कणीस तोडल्याच्या कारणावरून तिघांनी एकाच कुटुंबासह नातेवाईकांवर काठी-दगडांनी हल्ला चढवत बेदम मारहाण केली. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून, बोराखेडी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय यशवंत मेढे (वय ४३, रा. वाडी, ता. खामगाव) हे आपल्या नातेवाईकांसह दरवर्षीप्रमाणे गोसींग शिवारातील देवस्थान येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी लहान मुले जवळील शेतात खेळत असताना त्यांनी काही मक्याची कणसे तोडल्याचे सांगितले जाते.
याच कारणावरून शेतमालक सुरेंद्र खोदले यांनी संताप व्यक्त करत वाद घालण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून विजय मेढे व त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता वाद अधिकच चिघळला. काही वेळातच विलास खोदले व सुनिल खोदले हेही तेथे आले आणि तिघांनी मिळून हातातील काठ्या व दगडांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला.
या मारहाणीत विजय मेढे, त्यांची पत्नी वैशाली मेढे, मुलगा आर्यन तसेच नातेवाईक निखील हेलोडे, निलेश मेढे व नितेश हेलोडे हे जखमी झाले. आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, आरोपींनी फिर्यादीच्या वाहनाच्या समोरील काचा फोडून अंदाजे तीन हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात सुरेंद्र, विलास व सुनिल खोदले या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई एएसआय अरुण सपकाळ यांनी केली असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सदानंद हाडे करत आहेत.
किरकोळ कारणावरून एवढ्या मोठ्या हिंसाचाराला तोंड फुटल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top