Dhangar community : बाळापूर–पातूर मार्गावरील चान्नी फाट्याजवळ धनगर समाजाने एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी रास्ता राेकाे आंदाेलन केले. या आंदाेलनात परिसरातील समाज बांधव माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. त्यामुळे, अर्ध्या तासात तीन चार किमी वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. हे रास्ता राेकाे आंदाेलन शांततेत पार पडले.

अर्ध्या तासात लागल्या ३ ते ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर–पातूर मार्गावरील चान्नी फाट्याजवळ धनगर समाजाने एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी रास्ता राेकाे आंदाेलन केले. या आंदाेलनात परिसरातील समाज बांधव माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. त्यामुळे, अर्ध्या तासात तीन चार किमी वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. हे रास्ता राेकाे आंदाेलन शांततेत पार पडले.
या आंदोलनात बाळापूर व पातूर तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरक्षणासाठी झालेल्या या रस्ता रोकोत ओम लासूरकार, सुमित नवलकर, सचिन नागे, बळकृष्ण वसतकार, रवी सोनोने, विठ्ठल कवळकार, महादेवराव आगलते, गोपाळ कळंब, ज्ञानेश्वर तांबडे, गोपाल कळम, शिवाजीराव देवकते, गौरव काळे, प्रशांत पातोंड, अतुल पातोंड, भगवान पातोंड, सचिन माळी, रोशन वसतकार, सुभाष खराटे, गजानन कवडकार, अनंता भोरे, संजय गावंडे, गजानन गावंडे, शंकर लासुरकार, सुभाष लासुरकार, वैभव लासुरकार, शुभम चिकटे, राजकुमार चिकटे, पंढरीनाथ गडदे आदींसह समस्त धनगर समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. काही आंदोलनकर्त्या युवकांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली व नंतर सोडून देण्यात आले. या रस्ता रोकोसाठी बाळापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार झोडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक लाहोळे तसेच मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

