Mahabreaking

🔴 BREAKING
 Rajya Sabha elections :राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले उमेदवार Woman molested in Rohana :रोहणा येथे महिलेचा विनयभंग; पतीवर लोखंडी गजाने हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला  Rajya Sabha elections :राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले उमेदवार Woman molested in Rohana :रोहणा येथे महिलेचा विनयभंग; पतीवर लोखंडी गजाने हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

 Rajya Sabha elections :राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले उमेदवार

Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री रामदास अठावले आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माया चिंतामन इवनाते आणि रामराव वडकुते यांचाही समावेश आहे.

 Rajya Sabha elections

आतापर्यंत १३ उमेदवारांची घोषणा; १६ मार्चला ३७ जागांसाठी मतदान

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री रामदास अठावले आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माया चिंतामन इवनाते आणि रामराव वडकुते यांचाही समावेश आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी भारत या पेजला भेट द्या 

याआधी पक्षाने पहिल्या यादीत सहा राज्यांतील नऊ उमेदवारांची घोषणा केली होती. आता एकूण सात राज्यांमधून १३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
बिहारमधून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना राज्यसभेसाठी पाठवले जाणार असून शिवेश कुमार यांचीदेखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा यांना संधी देण्यात आली आहे.
आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन, हरियाणातून संजय भाटिया, ओडिशामधून मनमोहन सामल व सुजीत कुमार, तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एप्रिल २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या सदस्यांच्या जागा रिक्त
राज्यसभेतील संबंधित सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होत असल्याने या जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ शपथविधीपासून पुढील सहा वर्षे, म्हणजे २०३२ पर्यंत असेल.
महाराष्ट्रातील सात, तमिळनाडूमधील सहा, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी पाच जागांसाठी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, रामदास अठावले, कणिमोळी, तिरुचि शिवा तसेच राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे.

१६ मार्चला मतदान, त्याच दिवशी मतमोजणी
भारतीय निवडणूक आयोगने १८ फेब्रुवारी रोजी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर केली होती. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल आणि सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाईल.
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या जांभळ्या (वायलेट) रंगाच्या विशेष पेनचाच वापर अनिवार्य असणार आहे. इतर कोणत्याही पेनचा वापर अमान्य ठरणार आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निष्पक्ष पार पडावी यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच काही राज्यांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिमाही राबवण्यात येत आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top