Mahabreaking

[breaking_news]

Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष

Bhim Jayanti Celebrated : येथे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवाची सुरुवात 13 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माच्या पाळणा कार्यक्रमाने झाली. यावेळी उपस्थित महिलांमध्ये विमलबाई मगर, सविता आराख, मंडूबाई पैठणे, कौशल्याबाई साळवे, कमलबाई साळवे व रंजना साळवे यांनी पाळणा गीत सादर केले. तसेच यावेळी आकर्षक आतषबाजीही करण्यात आली.

Bhim Jayanti Celebrated

फकीरा पठाण 

मलकापूर पांग्रा : येथे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवाची सुरुवात 13 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माच्या पाळणा कार्यक्रमाने झाली. यावेळी उपस्थित महिलांमध्ये विमलबाई मगर, सविता आराख, मंडूबाई पैठणे, कौशल्याबाई साळवे, कमलबाई साळवे व रंजना साळवे यांनी पाळणा गीत सादर केले. तसेच यावेळी आकर्षक आतषबाजीही करण्यात आली.

Bhim Jayanti

त्यानंतर 14 एप्रिल रोजी सकाळी मलकापूर पांग्रा येथील मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी बौद्ध वाड्यातील अनेक उपासक उपस्थित होते. अर्जुन मगर, सर्जेराव मगर, सुनील टेलर, नवनाथ नगर, अमोल पैठणी, अभिमान साळवे, निखिल सोनकांबळे, पवन मगर, सुरज मगर, पवन साळवे, विशाल साळवे, विकास साळवे, तुषार सोनकांबळे, प्राण मोरे, रोहित साळवे, सुनील मगर, सुनील काकडे, पंढरी मगर, सुनील बनसोडे, गजानन लहाने, राज साळवे, राहुल साळवे, अजय साळवे, प्रशांत इंगळे, पंकज अंभोरे, सुदाम साळवे, भानदास साळवे, गौतम साळवे, प्रकाश साळवे आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

सायंकाळी मिरवणुकीपूर्वी वरिष्ठ पत्रकार भगवान साळवे यांच्या हस्ते रथातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विधीवत पूजा करण्यात आली व हार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचशील युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.  संचालन संदीप साळवे यांनी केले, तर मेजर शरद साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top