Mahabreaking

[breaking_news]

child marriage :बालविवाह लावल्यास थेट गुन्हे, लग्नात सहभागी झाल्यास वऱ्हाडी, भटजी, वाजंत्रीही येणार गोत्यात

child marriage :बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी सर्वाधिक बालविवाह होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसते. ग्रामीण व शहरी भागात १९ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.तसेच बालविवाह लावल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बाल विवाहात  सहभागी झाल्यास वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री एवढेच नव्हे तर मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशाराही डिघुळे यांनी दिला आहे.

child marriage

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; नियम मोडल्यास कडक कारवाईचा इशारा

बुलढाणा  : बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी सर्वाधिक बालविवाह होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसते. ग्रामीण व शहरी भागात १९ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.तसेच बालविवाह लावल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बाल विवाहात  सहभागी झाल्यास वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री एवढेच नव्हे तर मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशाराही डिघुळे यांनी दिला आहे.

भारतीय कायद्यानुसार मुलाचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासून खात्री करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून, केवळ पालकच नव्हे तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

गावात किंवा परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस विभागाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, संशयास्पद विवाहांची माहिती तत्काळ देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.

गावपातळीवरील समित्यांवर जबाबदारी

बाल विवाह रोखण्यासाठी गावपातळीवर असलेल्या समित्यांची जबाबदारी महत्वाची असते. या समित्यांनी जबाबदारी कार्य केल्यास बालविवाहांचे प्रमाण कमी होणार आहे.गाव पातळीवर  सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासून खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top