Barshitakli Police : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी शनिवारी (३० मे) पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध गावठी दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या. या कारवाईत सुमारे एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गावठी दारू विक्री करणाऱ्या पाच जणांसह जुगार खेळणाऱ्या चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एक लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त; नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
बबन इंगळे
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी शनिवारी (३० मे) पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध गावठी दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या. या कारवाईत सुमारे एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गावठी दारू विक्री करणाऱ्या पाच जणांसह जुगार खेळणाऱ्या चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडकी तांडा, धाबा, लोहगड तांडा, एरंडा, शिंदखेड तसेच पूनोती खुर्द या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू विक्री व जुगार अड्ड्यांबाबत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापेमारी केल्याचे समजते.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गावठी दारू, रोख रक्कम तसेच जुगार साहित्य असा एकूण सुमारे एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संबंधित आरोपींविरुद्ध कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी विष्णू ढोरे, प्रवीण मस्के, अजय अंभोरे, राजू बाभुळकर, अमित सुगंधी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल येणेवार, योगेश पडवळ, मनोज सावदेकर आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

