Bar Council of India: बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य तथा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले सदस्य अॅड. आशिष देशमुख यांचा बाळापूर बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

‘अन्यायाविरुद्ध लढण्याच्या प्रेरणेनेच बार कौन्सिलपर्यंतचा प्रवास’ – अॅड. आशिष देशमुख
बाळापूर : बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य तथा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले सदस्य अॅड. आशिष देशमुख यांचा बाळापूर बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना अॅड. आशिष देशमुख म्हणाले, “सन १९९९ मध्ये माझ्यावर झालेला अन्याय मी सहन करू शकलो नाही. त्याविरोधात लढण्याची प्रेरणा आणि विधी व्यवसायाविषयीचे प्रेम यामुळेच मला बार कौन्सिलच्या निवडणुकीत उतरून काम करण्याचे बळ मिळाले. वकिलांच्या विश्वासामुळेच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलवर सलग तीन वेळा निवडून येण्याची संधी मिळाली.”
हा सत्कार सोहळा १७ जुलै रोजी सायंकाळी राम मंदिर, बाळापूर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. टी. इंगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून पातूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. किरण सरदार, शेगाव बार असोसिएशनचे अॅड. किशोर चोपडे तसेच अॅड. एम. ए. मानकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. एस. टी. इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. डी. टी. जंजाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा अॅड. व्ही. एच. बंड यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे नवनिर्वाचित सदस्य तथा बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अॅड. आशिष देशमुख यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला बार असोसिएशनचे सचिव अॅड. चौखंडे, सहसचिव अॅड. शहाला मॅडम, तसेच बाळापूर, पातूर आणि शेगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

