freedom struggle: १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विशेष मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या पूर्वजांच्या त्यागावर प्रकाश टाकण्यात आला.

स्वातंत्र्यलढ्याचा माहीत नसलेला इतिहास नव्या पिढीने जाणून घ्यावा : मौलाना इस्माईल ईशाआती
बाळापूर : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विशेष मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या पूर्वजांच्या त्यागावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी मौलाना इस्माईल ईशाआती यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, १५ ऑगस्ट हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अत्यंत व्यापक असून, त्यातील अनेक महत्त्वपूर्ण पैलू आजही सर्वसामान्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करणारे विद्वान, इतिहास संशोधक तसेच देशासाठी त्याग करणाऱ्या पूर्वजांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी नव्या पिढीने स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जाणून घेण्याची गरज व्यक्त केली.
मौलाना इस्माईल ईशाआती म्हणाले की, स्वातंत्र्य हे संघर्ष, एकता, त्याग आणि बलिदानाच्या प्रदीर्घ प्रवासातून मिळाले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहण आणि उत्सवापुरता मर्यादित न ठेवता देशाची एकता, बंधुभाव आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील दुर्लक्षित आणि कमी परिचित पैलूंचा अभ्यास करून देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

