Mahabreaking

[breaking_news]

  youth drowns :धोधानी धबधब्यात पोहण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; २२ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

youth drowns : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या धोधानी येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. साहिल अहमद जमील अहमद (वय २२, रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) असे मृतक युवकाचे नाव आहे.

youth drowns

  पाण्याचा अंदाज चुकला अन् काळाचा घाला; धोधानी येथे युवकाचा दुर्दैवी अंत

निशांत गवई

पातूर : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या धोधानी येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. साहिल अहमद जमील अहमद (वय २२, रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) असे मृतक युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील काही युवक धोधानी येथील प्रसिद्ध धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी साहिल अहमद जमील अहमद (वय २२, रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

साहिल बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहायक ठाणेदार अजय वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अक्रम पठाण, इस्माईल मुल्ला आदींनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही केली.

पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. युवकाच्या मृत्यूची माहिती परिसरात पसरताच प्राथमिक आरोग्य केंद्रात नातेवाईकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

या घटनेमुळे धोधानी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटनस्थळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता पोहण्याचा प्रयत्न करणे किती धोकादायक ठरू शकते, हे या दुर्घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top