Mahabreaking

[breaking_news]

Accused fugitive :मध्यप्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी गजाआड

Accused fugitive : मध्य प्रदेशात पत्नीची दगडाने ठेचून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड करण्यात यश आले आहे. या आरोपीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Accused fugitive

मूर्तिजापूर शहर पोलिसांची सतर्कता; पत्नीची दगडाने ठेचून केली होती हत्या

मूर्तिजापूर : मध्य प्रदेशात पत्नीची दगडाने ठेचून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड करण्यात यश आले आहे. या आरोपीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निंभा येथील भोंदूबाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी

२५ एप्रिल २०२६ रोजी सकाळच्या सुमारास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन येथे एक इसम स्वतःहून हजर झाला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने धक्कादायक कबुली दिली. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मीना डॅम येथे त्याने आपल्या पत्नी बाली मुंगीया जावरकर हिचा दगडाने ठेचून खून केल्याचे सांगितले. खून केल्यानंतर मृतदेह डॅमच्या पाण्यात टाकून तो तेथून फरार झाल्याचेही त्याने कबूल केले.

या कबुलीनंतर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनेची शहानिशा केली. यावेळी बैतूल बाजार पोलीस स्टेशन (मध्यप्रदेश) येथील पोलीस निरीक्षक अंजना धुर्वे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीविरुद्ध अप. क्र. १२४/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम १०३ (२) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल असून तो घटनेपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीची ओळख पटवून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी त्याला तात्पुरता ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. दरम्यान, बैतूल बाजार पोलीस स्टेशनचे तपास पथक मूर्तिजापूर येथे दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक  चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, स.फौ. सुरेश पांडे, स.फौ. संतोष अंबिलवादे, पोहेकॉ इरफान्नोदिन, पोकॉ नामदेव आडे, पोकॉ  पवन बोचरे, पोकॉ सुरेंद्र शेजव, पोकॉ शाम आठवे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी केली. मूर्तिजापूर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक होऊन पुढील तपासाला गती मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top