Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Assistant Commissioner :समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक मांटे यांचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे सत्कार

Assistant Commissioner : कठीण परिस्थितीतून जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) तब्बल दोन वेळा वर्ग-१ पदासाठी निवड होऊन चौथ्या क्रमांकाने यश मिळविणारे मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथील सुपुत्र दीपक सु. मांटे यांचा दिनांक २३ फेब्रुवारी रोजी लोकसेवा नशामुक्ती व्यसनमुक्ती केंद्रात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Assistant Commissioner

साखरखेर्डा : कठीण परिस्थितीतून जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) तब्बल दोन वेळा वर्ग-१ पदासाठी निवड होऊन चौथ्या क्रमांकाने यश मिळविणारे मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथील सुपुत्र दीपक सु. मांटे यांचा दिनांक २३ फेब्रुवारी रोजी लोकसेवा नशामुक्ती व्यसनमुक्ती केंद्रात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

साखरखेर्ड्याच्या आम्रपाली गवईला पाली विषयात सुवर्णपदक

दीपक मांटे यांची समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त तसेच इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागात सहाय्यक संचालक या पदांवर निवड झाली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

दरेगाव या आपल्या मूळ गावी लोकसहभाग आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. आज दरेगाव तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जात असून, गावकऱ्यांनी जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र आल्यास काय साध्य होऊ शकते, याचे उदाहरण दरेगावने घालून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी लोकसेवा व्यसनमुक्ती केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. आतापर्यंत या केंद्रातून १,००० हून अधिक तरुणांनी दारूचे व्यसन सोडल्याची माहिती देण्यात आली. या कार्याबद्दल त्यांनी केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे पाटील यांचे विशेष कौतुक केले.या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष प्रताप दादा मोरे यांच्या हस्ते दीपक मांटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समाधान सरकटे, तालुका अध्यक्ष गणेश पंजरकर, पत्रकार अहमद कुरेशी, जुबेर शहा, गणेश काळे, पिंपळगावचे माजी उपसरपंच बंडू ठाकूर तसेच नशामुक्ती व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top