Mahabreaking

[breaking_news]

APMC employee assaulted : ‘तुमच्यामुळे माझी नोकरी गेली’ म्हणत बाजार समिती कर्मचाऱ्याला मारहाण; देऊळगाव राजात गुन्हा दाखल

APMC employee assaulted : कृषी उत्पन्न बाजार समिती, देऊळगाव राजा येथील कार्यालयात शासकीय काम सुरू असताना एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कनिष्ठ लिपिकाची कॉलर पकडत चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गणेश सिताराम म्हस्के (रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

APMC

   शासकीय कामात अडथळा आणत बाजार समितीतील कनिष्ठ लिपिकास कॉलर पकडून मारहाण

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : कृषी उत्पन्न बाजार समिती, देऊळगाव राजा येथील कार्यालयात शासकीय काम सुरू असताना एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कनिष्ठ लिपिकाची कॉलर पकडत चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गणेश सिताराम म्हस्के (रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी किशोर सिताराम म्हस्के (वय ५६) हे कृषी उत्पन्न बाजार समिती, देऊळगाव राजा येथे कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी ते कनिष्ठ लिपिक रावसाहेब शामराव कोल्हे, विलास दगडुजी कव्हळे तसेच शिपाई सारिका मिलन राठोड यांच्यासोबत कार्यालयीन कामकाज करीत होते.

दरम्यान, आरोपी गणेश म्हस्के हा बाजार समितीच्या कार्यालयात आला. त्याने फिर्यादी व उपस्थित कर्मचाऱ्यांना उद्देशून, ‘तुमच्यामुळे माझी नोकरी गेली,’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी व कर्मचाऱ्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने आक्रमक होत कनिष्ठ लिपिक रावसाहेब कोल्हे यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय आरोपीने अश्लील भाषेत शिवीगाळ करून कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे बाजार समितीच्या कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे.

घटनेनंतर फिर्यादी किशोर म्हस्के यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३२, १२१(१), २९६, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा क्रमांक ४०६/२०२६ दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रम्ही गिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top