Mahabreaking

[breaking_news]

Teachers Day: शिक्षक दिनी माजी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; कारेगावच्या शाळेत वृक्षारोपण

Teachers Day: जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, कारेगाव येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यानिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सप्तपदीची रोपे आणून शालेय परिसरात वृक्षारोपण केले.

Teachers Day

 शिक्षक दिनाचा त्रिवेणी संगम; वृक्षारोपण, विद्यार्थी शिक्षक आणि दहीहंडीचा उत्साह

भागवत चव्हाण

कारेगाव : जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, कारेगाव येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यानिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सप्तपदीची रोपे आणून शालेय परिसरात वृक्षारोपण केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास टोलमारे, माजी अध्यक्ष भागवतराव चव्हाण, गणेश चव्हाण, दिनकर चव्हाण, विनायक आवारे, अनंतराव गायकवाड व शंकर पांचाळ यांनी स्वतः खड्डे खोदून वृक्षारोपण केले. या उपक्रमात पालक, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनीही शिक्षकांची भूमिका पार पाडत वर्गातील अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून घेतलेला हा अनुभव आणि त्यांचा उत्स्फूर्त सहभाग उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरला. शाळेत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

याच दिवशी शाळेत दहीहंडी उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सवात शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण शालेय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top