Mahabreaking

[breaking_news]

Akshay Guthe :शिक्षणाचा अंतिम उद्देश नोकरी नव्हे, तर चांगला माणूस बनणे’ – डॉ. अक्षय गुठे

Akshay Guthe : ICI कोचिंग क्लासेसचे संचालक शिक्षक फुके सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अक्षय गुठे यांनी शिक्षणाच्या खऱ्या उद्देशावर प्रकाश टाकला. “शिक्षणाचा अंतिम उद्देश नोकरी मिळवणे नसून चांगला व जबाबदार माणूस बनणे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

Akshay Guthe

  ध्येय निश्चित करा, अपयशातून शिका अन् पुढे चला; डॉ. अक्षय गुठे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

गजानन तिडके

देऊळगावराजा : ICI कोचिंग क्लासेसचे संचालक शिक्षक फुके सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अक्षय गुठे यांनी शिक्षणाच्या खऱ्या उद्देशावर प्रकाश टाकला. “शिक्षणाचा अंतिम उद्देश नोकरी मिळवणे नसून चांगला व जबाबदार माणूस बनणे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी केवळ गुण आणि नोकरीच्या मागे न लागता शिस्त, प्रामाणिकपणा, संस्कार, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी. आयुष्यात मोठे ध्येय निश्चित करून सातत्याने मेहनत करावी तसेच अपयशातून शिकत आत्मविश्वासाने पुढे जावे, असा संदेश डॉ. गुठे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

“उद्याचा डॉक्टर, अभियंता, शिक्षक किंवा अधिकारी होण्यापूर्वी प्रत्येकाने एक चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शिक्षक फुके सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top