Mahabreaking

[breaking_news]

 Jigaon project :अकोला शहराला दीड वर्षात जीगाव प्रकल्पातून मिळणार पाणी

Jigaon project : शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या कायमची दुर होणार असून येत्या दीड वर्षात जिगाव प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी शहरातील विविध भागात  १३ नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असल्याची माहिती अकोला महापालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 Jigaon project

 महापालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती

अकोला : शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या कायमची दुर होणार असून येत्या दीड वर्षात जिगाव प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी शहरातील विविध भागात  १३ नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असल्याची माहिती अकोला महापालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पातून शहराला २८ एमएलटी पाणी मिळणार आहे. त्या अनुषंगाने निमकर्दा येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच भारतीय जनता पक्षाची शताब्दी वर्षानिमित्त शहरातील सर्व प्रभागात उद्यापासून स्वच्छता अभियान प्रारंभ होणार असून नदीचे स्वच्छ अभियान अंतर्गत ८५ टक्के पूर्ण झाले आहे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे‌.

कचरा संकलन शुल्क वार्षिक ६०० रुपये आकारण्यात येणार आहे. तो घर टॅक्स पावतीमध्ये समाविष्ट असणार. प्रशासक कालावधीत कचरा संकलन कंत्राट नियुक्त करण्यात आला होता, नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे त्यांचे काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास एका महिन्याचे २७ लाख रुपये दिले आहेत.    अकोला महापालिका या पाच वर्षांत कोणत्याही प्रकारचा टॅक्स वाढवणार नाही अशी ग्वाही सभापती विजय अग्रवाल यांनी दिली.  शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचे आपले ध्येय आहे. अकोला शहरात खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नाने शहराला ई बस मिळाल्या आहेत. त्यासाठी चार्जिंग सेंटरची आवश्यकता असल्याने त्याचे बांधकाम व इतर कामे येत्या २ ते महिन्यात पूर्ण होणार आहे‌ अशी माहिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top