Mahabreaking

[breaking_news]

Massive Fire at Vatika Chowk :शेगावात वाटिका चौकात भीषण आग, आठ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

Massive Fire at Vatika Chowk :शहरातील वाटिका चौकात असलेल्या खाऊ चौपाटीवर बॅनर डाळ शिजत असलेल्या गॅसवर पडल्याने २२  एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केल्याने जवळपास आठ दुकाने जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Massive Fire at Vatika Chowk

बॅनर गॅसवर पडल्याने उडाला आगीचा भडका; खाऊ गल्लीत आगीचे तांडव

शेगाव : शहरातील वाटिका चौकात असलेल्या खाऊ चौपाटीवर बॅनर डाळ शिजत असलेल्या गॅसवर पडल्याने २२  एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केल्याने जवळपास आठ दुकाने जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शेगाव शहरातील वाटिका चौकात असलेल्या खाऊ गल्लीत बुधवारी सायंकाळी आग लागली. दुकानात लागलेले बॅनर डाळ शिजत असलेल्या गॅसवर पडून आगीचा भडका उडाला.  एका दुकानात गॅस भट्टीवर तळण सुरू असताना मागे लागलेले बॅनर गॅसवर पडून आग लागली. त्या बॅनरमुळे ज्याच्या नळीवर आग लागली त्यामुळे भट्टीजवळ आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. काही वेळातच शेजारील सिलिंडरने पेट घेतला. या आगीत पावभाजी सेंटर, पाणीपुरी सेंटर, मुंबई वडापाव, पान सेंटर, छोले भटुरे, भेळ भांडार, चायनीज सेंटर अशा ८ दुकानांनी पेट घेतला. आगीच्या भडक्यामुळे संपूर्ण चौपाटी आगीच्या विळख्यात सापडली. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे दोन अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शेगाव शहर पोलिसांनीही तातडीने धाव घेतली.अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत ८ दुकाने व त्यातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीत दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top