Mahabreaking

[breaking_news]

unique movement :CCTV ला बेसरमच्या पानांचा हार घालून अनोखे आंदोलन; अवैध वाळू वाहतुकीवर युवासेनेचा संताप

 unique movement :  तालुक्यातील मंडपगाव येथील महसूल गेटवर शासनाने बसविलेल्या CCTV कॅमेऱ्याला युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर आणि सामाजिक कार्यकर्ते सचिनभाई कदम यांनी बेसरमच्या पानांचा हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. महसूल गेटखालून दिवस-रात्र सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
A unique movement
 ‘कॅमेरे आहेत, कारवाई कुठे?’ मंडपगावात युवासेनेचा प्रशासनाला सवाल

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील मंडपगाव येथील महसूल गेटवर शासनाने बसविलेल्या CCTV कॅमेऱ्याला युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर आणि सामाजिक कार्यकर्ते सचिनभाई कदम यांनी बेसरमच्या पानांचा हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. महसूल गेटखालून दिवस-रात्र सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने सार्वजनिक निधीतून उभारलेल्या CCTV यंत्रणेमध्ये अवैध वाळू वाहतुकीचे पुरावे, वाहनांची ये-जा आणि संबंधित हालचाली स्पष्टपणे दिसून येत असतानाही महसूल, पोलीस आणि खनिकर्म विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संतोष भुतेकर यांनी यावेळी बोलताना, “CCTV फुटेजमध्ये जर अवैध वाळू वाहतूक स्पष्टपणे दिसत असेल आणि त्यानंतरही संबंधित विभागांकडून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमांनुसार गुन्हे दाखल होत नसतील, तर ती केवळ निष्क्रियता नसून कर्तव्यातील गंभीर कसूर आहे,” असा आरोप केला.

आंदोलनकर्त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित कालावधीतील CCTV फुटेज जप्त करून त्याची तपासणी करण्यात यावी, अवैध वाळू वाहतुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींवर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, महसूल गेट आणि CCTV यंत्रणा केवळ दिखाऊ उपाययोजना ठरत आहेत का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कठोर कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या अनोख्या आंदोलनाची परिसरात चर्चा रंगली असून अवैध वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रशासनाची भूमिका चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top