Construction Supervisor Course : सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणासोबत रोजगाराभिमुख कौशल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक’ हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम रोजगार आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पर्याय ठरत आहे. हा अभ्यासक्रम जिल्ह्यातील एकमेव शासनमान्य स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा येथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले असून मोजक्याच जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी आपले प्रवशे निश्चित करावे असे डॉ. सचिन सुपे यांनी आवाहन केले आहे.

१०वी नंतर करिअरची सुवर्णसंधी; बांधकाम पर्यवेक्षक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती
बुलढाणा : सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणासोबत रोजगाराभिमुख कौशल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक’ हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम रोजगार आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पर्याय ठरत आहे. हा अभ्यासक्रम जिल्ह्यातील एकमेव शासनमान्य स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा येथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले असून मोजक्याच जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी आपले प्रवशे निश्चित करावे असे डॉ. सचिन सुपे यांनी आवाहन केले आहे.

स्थापत्य क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) या पदासाठी पात्रता प्राप्त होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), एमआयडीसी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, पाटबंधारे विभाग, सिडको, म्हाडा, ग्रामीण सडक योजना यांसारख्या विविध शासकीय विभागांमध्ये सेवा भरतीच्या संधी उपलब्ध होतात.
याशिवाय नामांकित खासगी बांधकाम कंपन्यांमध्ये कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणून रोजगार मिळविता येतो. स्वतःचा बांधकाम कंत्राटदार व्यवसाय सुरू करण्याची संधीही या अभ्यासक्रमातून निर्माण होते. ठेकेदार परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षणदेखील विद्यार्थ्यांना दिले जाते.
अभ्यासक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांत उपलब्ध असून विद्यार्थ्यांना इच्छेनुसार कोणत्याही एका भाषेत परीक्षा देता येते. टेंडर डॉक्युमेंट, टेंडर नोटीस, जनरल कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट यांसारख्या बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळते.

विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी संस्थेकडून मिळते सहकार्य
संस्थेमध्ये कॉम्प्युटराईज्ड अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, नियमित वर्ग आणि भरपूर प्रात्यक्षिकांवर विशेष भर दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांना एसटी बस पास सवलतीचा लाभ उपलब्ध करून दिला जातो. अत्यल्प शुल्क, फी भरण्यासाठी सुलभ हप्ते आणि मर्यादित प्रवेशामुळे हा अभ्यासक्रम अधिक आकर्षक ठरत आहे.विशेष म्हणजे, अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के प्रशिक्षण आणि प्लेसमेंटसाठी संस्थेकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळे १०वी नंतर अल्प कालावधीत तांत्रिक शिक्षण घेऊन शासकीय किंवा खासगी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम रोजगाराचा प्रभावी मार्ग ठरत आहे असे शासनमान्य स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.सचिन सुपे यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी येथे संपर्क करा
स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलडाणा
वानखेडे ले-आऊट,
डॉ. मेहेत्रे हॉस्पिटल जवळ,
रेणुका टायपिंग समोर, बुलडाणा
अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9422945811
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

