Mahabreaking

[breaking_news]

MLA Manoj Kayande :स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या जयंतीनिमित्त आमदार मनोज कायंदे यांचा आरोग्यसेवेचा महायज्ञ! २१ विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार

MLA Manoj Kayande :स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या जयंतीनिमित्त आमदार मनोज कायंदे यांचा आरोग्यसेवेचा महायज्ञ! २१ विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार

Manoj Kayande

 आमदार मनोज कायंदे यांचा जनसेवेचा संकल्प; देऊळगाव राजात उद्या भव्य मोफत महाआरोग्य शिबिर, दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

गजानन तिडके 

देऊळगाव राजा  : समाजसेवेचा वारसा जपत सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्व. शिक्षणमहर्षी देवानंदभाऊ कायंदे यांच्या जयंतीनिमित्त देऊळगाव राजा येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार मनोज कायंदे मित्र मंडळ, मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा यांच्या पुढाकारातून रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत समर्थ शैक्षणिक संकुल, चिखली रोड, देऊळगाव राजा येथे हे शिबिर पार पडणार आहे.

स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादनाचे कार्यक्रम न घेता त्यांच्या समाजसेवेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्याचा संकल्प आमदार मनोज कायंदे यांनी केला आहे. याच सामाजिक बांधिलकीतून विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांना एकाच छताखाली आणून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

विविध २१ वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा!

या महाआरोग्य शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मेडिसिन, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, हृदयरोग, बालरोग, त्वचारोग, मूत्ररोग, किडनीविकार, मेंदूविकार, दंतविकार, मुखकर्करोग, स्त्रीरोग, छातीविकार, बालरक्तविकार, यकृत व पोटविकार, शस्त्रक्रिया, लहान मुलांचे रक्तविकार, मुख कर्करोग, फिजिओथेरपी तसेच मुळव्याध व भगंदर अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.

शिबिरात सहभागी होणारे तज्ज्ञ डॉक्टर :

  • मेडिसिन तज्ज्ञ : डॉ. प्रदीप हुसे, डॉ. अर्चना काबरा, डॉ. रामेश्वर बरकड, डॉ. आशिष राठोड, डॉ. रामदास सांगळे, डॉ. अमोल खवणे, डॉ. संकेत नागरे, डॉ. निखिल शिंदे, डॉ. अरुण जैन, डॉ. सुहास विचवे, डॉ. मनीष देशमुख, डॉ. सतीश माने, डॉ. निकिता सोनुने, डॉ. प्रफुल्ल डोईफोडे, डॉ. अमोल कुकडे.
  • अस्थिरोग तज्ज्ञ : डॉ. अतुल जिंतुरकर, डॉ. योगेश धावड, डॉ. पंढरी माने, डॉ. अनिरुद्ध माने, डॉ. संतोष जायभाये, डॉ. राजीव डोईफोडे, डॉ. अनिकेत करवा, डॉ. अमोल वाघ, डॉ. गजानन पंडित, डॉ. सुभाष शिंगणे, डॉ. अरविंद म्हस्के, डॉ. निशांत गोयल, डॉ. वैभव बायाळ, डॉ. तेजस ताठे, डॉ. प्रवीण सोनुने, डॉ. समाधान मुंढे, डॉ. कृष्णा कराड.
  • नेत्ररोग तज्ज्ञ : डॉ. प्रदीप जैन, डॉ. अमित काबरा, डॉ. गजेंद्र मुंढे, डॉ. कार्तिक कोल्हे, डॉ. प्रियांका वाघ, डॉ. स्वाती सांगळे.
  • बालरोग तज्ज्ञ : डॉ. स्मिता काकड, डॉ. अश्विन कथार, डॉ. शिवकुमार दराडे, डॉ. शिवदास मिरकड, डॉ. विलास दराडे, डॉ. नामदेव वाय, डॉ. संदीप सोनसाळे, डॉ. विठ्ठल देशमुख, डॉ. सचिन वाय, डॉ. विश्वनाथ दिघोळे, डॉ. दीपक सानप, डॉ. प्रवीण तिडके, डॉ. बालाजी तायडे.
  • छातीविकार तज्ज्ञ : डॉ. रमेश काकड, डॉ. गणेश कानडे, डॉ. युवराज म्हस्के, डॉ. सुदर्शन माने.
  • कान, नाक, घसा तज्ज्ञ : डॉ. परमानंद भक्कड, डॉ. सुरज चव्हाण, डॉ. सागर गंगवाल, डॉ. रवी सानप.
  • स्त्रीरोग तज्ज्ञ : डॉ. संजय नागरे, डॉ. अंजली हुसे, डॉ. अनिल कायंदे, डॉ. सीमा डोईफोडे, डॉ. प्रियदर्शनी काकड, डॉ. राजश्री जायभाये, डॉ. वर्षा डोईफोडे, डॉ. अमोल केंद्रे, डॉ. प्रवीण काळे, डॉ. अपर्णा शिंदे, डॉ. शारदा माने.
  • त्वचारोग तज्ज्ञ : डॉ. प्रमोद डोईफोडे, डॉ. विपुल जैन, डॉ. सीमा माने, डॉ. दत्ता माने, डॉ. धनंजय सानप, डॉ. प्रज्ञा मुंढे, डॉ. आनंद राठी.
  • लिव्हर व पोटविकार तज्ज्ञ : डॉ. हरीश दरक, डॉ. नरेंद्र नागरे पाटील.
  • शस्त्रक्रिया तज्ज्ञ : डॉ. गोविंद पाटील, डॉ. भूषण मनियार, डॉ. हितेश भक्कड, डॉ. कैलास चौधरी, डॉ. अमोल थोटे.
  • लहान मुलांचे रक्तविकार तज्ज्ञ : डॉ. सुयोग नागरे.
  • मेंदूविकार तज्ज्ञ : डॉ. प्रल्हाद धास्कर, डॉ. रोशन चव्हाण, डॉ. अनिरुद्ध पाटील, डॉ. अतुल काळे.
  • दंतरोग तज्ज्ञ : डॉ. भारत कायंदे, डॉ. अतुल गिते, डॉ. अशुतोष सोळंकी, डॉ. ज्ञानेश्वर सांगळे, डॉ. मंगेश काकड, डॉ. कांचन ताठे, डॉ. उषा नागरे.
  • मुख कर्करोग तज्ज्ञ : डॉ. सतीश खांड, डॉ. अवधूत फड.
  • हृदयविकार तज्ज्ञ : डॉ. एकनाथ सानप, डॉ. रामेश्वर सानप, डॉ. विष्णू भुते, डॉ. कृष्णा कोरडे, डॉ. शिल्पा देशमुख.
  • किडनी रोग तज्ज्ञ : डॉ. दीपक थोरवे, डॉ. प्रवीण लड्ढा, डॉ. तुषार अग्रवाल, डॉ. सचिन मिसाळ, डॉ. शालिक जाधव.
  • मुळव्याध व भगंदर तज्ज्ञ : डॉ. सुनील नागरे, डॉ. आकाश खराडे, डॉ. प्रियांका सोळंकी, डॉ. गोपाल कुटे.
दिव्यांगांना कृत्रिम अवयव व श्रवणयंत्रांचे मोफत वाटप!

या महाआरोग्य शिबिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयवांचे वितरण आणि श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे केवळ आजारांची तपासणीच नव्हे, तर दिव्यांगांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्याचे कामही या माध्यमातून होणार आहे.

शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यासह मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांसाठी ही मोठी आरोग्यसंधी ठरणार आहे.

आमदार मनोज कायंदे यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम!

राजकारण हे केवळ सत्ता आणि पदापुरते मर्यादित नसून सामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे, या भावनेतून आमदार मनोज कायंदे यांनी या महाआरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा हा प्रयत्न असून आरोग्यसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडण्याचा त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण उपचार पुढे ढकलतात. अशा रुग्णांना आपल्या परिसरातच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत उपलब्ध व्हावी, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे.

गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा!

रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत समर्थ शैक्षणिक संकुल, चिखली रोड, देऊळगाव राजा येथे हे शिबिर होणार आहे. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तसेच परिसरातील नागरिकांनी आणि विशेषतः गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मनोज कायंदे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाजनिर्मितीच्या दिशेने आमदार मनोज कायंदे यांनी उचललेले हे पाऊल स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top