Mahabreaking

[breaking_news]

Run for Unity :सरदार पटेल जयंतीनिमित्त बुलढाण्यात ‘रन फॉर युनिटी’चा उत्साह! पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात एकतेचा जागर

Run for Unity : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी ‘रन फॉर युनिटी’ राष्ट्रीय दौडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या दौडीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

.Run for

हिरवी झेंडी दाखवत निलेश तांबे यांनी दिला एकतेचा संदेश; बुलढाण्यात पोलीस दलाची भव्य राष्ट्रीय दौड

बुलढाणा : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी ‘रन फॉर युनिटी’ राष्ट्रीय दौडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या दौडीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

शनिवारी सकाळी ७ वाजता बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर या दौडीला प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवून ‘रन फॉर युनिटी’ राष्ट्रीय दौडीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशाच्या अखंडतेचे महत्त्व अधोरेखित केले.

शहरातील प्रमुख मार्गांवरून दौड; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पोलीस कवायत मैदानावरून सुरू झालेली ही मॅरेथॉन कारंजा चौक, एडेड चौक, नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत आणि त्रिशरण चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत पुन्हा पोलीस कवायत मैदानावर पोहोचली. या दौडीदरम्यान सहभागी धावपटूंनी राष्ट्रीय एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

या उपक्रमात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसह बुलढाणा शहरातील व्ही. डब्ल्यू. फाऊंडेशन, ध्येय फाऊंडेशन, निसर्ग मित्र ग्रुप, रणरागिनी ग्रुप, बुलढाणा सायकलिंग ग्रुप, ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप, एडेड स्कूल, एसबीआय बँक रनिंग ग्रुप आणि रामरक्षा इंग्लिश स्कूल, पाडळी येथील विद्यार्थी, शिक्षक व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या सुविद्य पत्नी सौ. गीतांजली निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केली. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेतली.

कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक रवी राठोड (प्रभार पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय), तसेच जिल्हा पोलीस दलातील अन्य अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश रत्नपारखी यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी केले.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. त्यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमातून आरोग्य, शिस्त, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top