Mahabreaking

[breaking_news]

A golden response :संघर्षाला दिले सुवर्णमोलाचे उत्तर! आरती खंडागळेची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

A golden response : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे आयोजित युनिव्हर्सिटी मॅचेस बॉक्सिंग स्पर्धेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कोराडी येथील विद्यार्थिनी कु. आरती रमेश खंडागळे हिने ५४ ते ५७ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या दैदिप्यमान कामगिरीच्या जोरावर तिची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

A golden response

बुलढाणा :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे आयोजित युनिव्हर्सिटी मॅचेस बॉक्सिंग स्पर्धेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कोराडी येथील विद्यार्थिनी कु. आरती रमेश खंडागळे हिने ५४ ते ५७ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या दैदिप्यमान कामगिरीच्या जोरावर तिची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मात्र, आरतीचे हे यश केवळ खेळापुरते मर्यादित नाही; त्यामागे संघर्ष, त्याग आणि जिद्दीची भावनिक कहाणी दडलेली आहे. घरातील हालाखीची परिस्थिती, मर्यादित आर्थिक साधनसामग्री आणि अनेक अडचणी असूनही आरतीने आपले स्वप्न कधीही सोडले नाही. गावापासून दूर राहत तिने सातत्याने कठोर सराव केला. तिच्या या जिद्दीवर आणि आत्मविश्वासावर तिचे वडील रमेश खंडागळे यांनी कायम विश्वास ठेवत तिला खंबीर पाठबळ दिले.

अंतिम लढतीत आरतीने विजय निश्चित केला, त्या क्षणी प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलीच्या विजयाने तिच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “माझी मुलगी अडचणींवर मात करून देशासाठी नाव कमवत आहे, हे पाहणे हाच माझा खरा विजय आहे,” असे भावूक शब्द त्यांनी व्यक्त केले.

स्पर्धेदरम्यान आरतीने आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि झुंजार खेळाचे अप्रतिम प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या यशात मार्गदर्शक श्री. संकेत धामंदे सर (एन. एस. कोच) यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे तिच्या खेळात सातत्य व धार निर्माण झाली आहे.

आरतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बॉक्सिंग परिवार, शेगाव यांच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच बॉक्सिंग असोसिएशन बुलढाणा यांच्या वतीने अध्यक्ष माननीय विठ्ठलराव लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष निलेश इंगळे, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. संतोष आंबेकर, जिल्हा सचिव संकेत धामंदे, सदस्य विनोद टिकार, सहसचिव राज सोळंकी, जिल्हा प्रशिक्षक संकेत रामदास सरोदे, पी. यू. राठोड सर आदींनीही तिच्या कामगिरीचे कौतुक केले.

संघर्षातून उभारी घेत जिद्दीच्या बळावर यश संपादन करता येते आणि मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हे आरती खंडागळेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. तिची ही वाटचाल अनेक नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top