Mahabreaking

[breaking_news]

The electricity pole :लोकवर्गणी परत करून उभा केला विद्युत पोल!  

The electricity pole : नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत लोकवर्गणी जमा करून नवीन विद्युत पोल उभा करण्याचा निर्णय घेतला. ही बाब बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. शैलेश सावजी यांनी वीज वितरण कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून सदर विद्युत पोल उभा करून दिला. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी जमा केलेली लोकवर्गणीही त्यांनी परत करून नागरिकांचा आर्थिक भार दूर केला.

The electricity pole

शेलगाव देशमुखात शैलेश सावजींची तत्काळ दखल, नागरिकांत समाधान

डोणगाव : मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या डॉ. गजानन अजगर यांच्या दवाखान्याजवळील विद्युत पोल अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. सदर पोल कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वारंवार निवेदन व विनंत्या केल्या. मात्र, अनेक वेळा पाठपुरावा करूनही संबंधित विद्युत पोल बदलण्यात आला नव्हता.

अखेर नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत लोकवर्गणी जमा करून नवीन विद्युत पोल उभा करण्याचा निर्णय घेतला. ही बाब बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. शैलेश सावजी यांनी वीज वितरण कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून सदर विद्युत पोल उभा करून दिला. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी जमा केलेली लोकवर्गणीही त्यांनी परत करून नागरिकांचा आर्थिक भार दूर केला.

या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, “अशाच तत्काळ सेवा देणाऱ्या लोकप्रतिनिधींची आज गरज आहे,” अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना केल्याबद्दल शैलेश सावजी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या वेळी ग्रामस्थांच्या वतीने शैलेश सावजी यांच्यासह माजी सरपंच विठ्ठलराव देशमुख, उपसरपंच शाम इंगळे व विनोद गोरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास माजी सरपंच विठ्ठलराव देशमुख, उपसरपंच विनोद गोरे, डोणगावचे उपसरपंच शाम इंगळे, तंटामुक्ती माजी अध्यक्ष प्रल्हाद गोरे, भिकाजी हरमकर, सिद्धेश देशमुख, संतोष गोरे, बबलु धाडकर, सुर्या अल्हाट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या घटनेमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या कामांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून, लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र शेलगाव देशमुख येथे पाहायला मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top