Mahabreaking

[breaking_news]

A golden career opportunity :आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; खामगाव पॅरामेडिकल कॉलेजमध्ये PGDMLT प्रवेश सुरू

A golden career opportunity : वाढत्या आरोग्य सेवांच्या गरजा आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता खामगाव पॅरामेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाची प्रभावी संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांच्या मान्यतेने सुरू असलेले हे महाविद्यालय २०२२ पासून कौशल्याधारित (Skill-Based) पॅरामेडिकल शिक्षण देत आहे.

A golden career opportunity

शासकीय नोकरीपासून स्वतःची लॅब सुरू करण्यापर्यंत संधी; खामगाव पॅरामेडिकल कॉलेजचा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम,            १०० टक्के प्लेसमेंटवर भर; शासनमान्य पॅरामेडिकल अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती

खामगाव : वाढत्या आरोग्य सेवांच्या गरजा आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता खामगाव पॅरामेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाची प्रभावी संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांच्या मान्यतेने सुरू असलेले हे महाविद्यालय २०२२ पासून कौशल्याधारित (Skill-Based) पॅरामेडिकल शिक्षण देत आहे.

शेगाव रोडवरील एसएसडीव्ही स्कूलजवळ, इंडियन पेट्रोल पंपाजवळ, शांतिनगर येथे नव्याने उभारलेल्या सुसज्ज इमारतीत महाविद्यालयाचे वर्ग सुरू असून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक प्रयोगशाळा, प्रशिक्षण सुविधा आणि अनुभवी प्राध्यापकांची उपलब्धता असल्याचे संस्थेने सांगितले आहे.

PGDMLT (Advanced Diploma in Medical Laboratory Technology)

महाविद्यालयात PGDMLT (Post Graduate Diploma in Medical Laboratory Technology) अर्थात Advanced Diploma in Medical Laboratory Technology हा MSBTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

  • शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (B.Sc.)
  • कालावधी : १.५ वर्षे (३ सेमिस्टर)
  • अभ्यासक्रम प्रकार : पूर्णवेळ (Full Time)

supe

रोजगाराच्या मोठ्या संधी

  हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तसेच खासगी रुग्णालये, डायग्नोस्टिक लॅब, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, संशोधन संस्था आणि आरोग्य क्षेत्रातील विविध प्रयोगशाळांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. हा अभ्यासक्रम केल्यास १०० टक्के रोजगार मिळतो. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण (Training) आणि प्लेसमेंटसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. तसेच अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी (Registration) मिळण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. या अभ्यासक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार स्वतःची क्लिनिकल लॅब सुरू करण्याची संधी उपलब्ध होते. याशिवाय शासकीय व खासगी आरोग्य संस्थांमध्ये नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (Marksheet) या अभ्यासक्रमातून मिळतात.

डॉ.सचिन सुपे, संस्थापक अध्यक्ष

 

प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर

विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न देता प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील अनुभव मिळावा, यासाठी महाविद्यालयात नियमित शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी विविध रक्तदान शिबिरे (Blood Donation Camps) आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा, रक्त संकलन, प्रयोगशाळा व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यपद्धतीचा अनुभव मिळतो.

प्रवेशासाठी संपर्क

प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांनी खामगाव पॅरामेडिकल कॉलेज, शेगाव रोड, एसएसडीव्ही स्कूलजवळ, इंडियन पेट्रोल पंपाजवळ, शांतिनगर, खामगाव येथे संपर्क साधावा.

संपर्क : ९४२२९४५८११ / ७०२०६५२२०६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top